Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खैरी निमगांव रस्त्यावर केबल कंपनीचे नियमबाह्य खोदकाम

निमगांवखैरी/प्रतिनिधी ः श्रीरामपूर-खैरी निमगांव या रस्त्यावर खासगी टेलीकॉम कंपनीद्वारे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असून नुकतेच गावातील शिवाजी

…तर, महावितरण कंपनी बंद होईल ; महावितरणने मांडले वास्तव
sangamner – संगमनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आरिफ देशमुख यांची निवड l LokNews24
आपल्या माणसांनी केलेला सन्मान कौतुकास्पद – सचिन सूर्यवंशी

निमगांवखैरी/प्रतिनिधी ः श्रीरामपूर-खैरी निमगांव या रस्त्यावर खासगी टेलीकॉम कंपनीद्वारे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असून नुकतेच गावातील शिवाजी साबळे यांच्या वस्तीजवळील पुलाची नळी सायपण दुरुस्त करताना दोनही बाजुने कट झाल्याने नळी अस्ताव्यस्तपणे फेकुन देण्यात आल्याचे परिसरातील नागरिकांकडून समजले असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो.
एका खासगी टेलीकॉम कंपनीद्वारे रस्त्याच्या कडेला भूमिगत केबल टाकण्याचे काम चालू आहे. हे काम करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियम व अटींना छेद देण्यात आला आहे. नियमबाह्य खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता असलेल्या रस्त्याचे नुकसान होत आहे. खोदकामामुळे लोकांना अडचण होत आहे. यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे, अशी तक्रार नागरीक आपसात करत आहेत. खोदकाम करणार्‍या या कंपनीस सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पोलिस वाहतूक शाखेची व संबंधित पोलिस स्टेशनची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु या कंपनीकडे पोलिस विभागाची तसेच बांधकाम विभागाची परवानगी आहे किंवा नाही हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. याप्रकरणाची चौकशी करून खोदकाम करणार्‍या कंपनीवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी विनंतीही नागरिकांनी केली आहे. दरम्यान सायपन करताना फुटलेली नळी सध्या मंजुर खैरी निमगांव-श्रीरामपूर रस्ता रुंदीकरण कामातुन केली जाणार का? शासकीय लोकांना ठेकेदाराची मोठी कळकळ यातुन दिसुन येत असुन पावसाळ्यात साईडपट्टया खचुन मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण हा ही प्रश्‍न नागरीकांमधुन विचारला जात आहे. यासंदर्भात संबंधीत विभागाला निवेदन देणार असुन वेळ पडल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे मत नागरीकांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS