Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयआयटी विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

मुंबई ः मुंबईसह उपनगरात कामानिमित्त जाणार्‍या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे काही जणांचा गर

शिवसेनेने सत्तेसाठी भाजपचा विश्वासघात केला : केशव उपाध्ये (Video)
जात गणनाः आवश्यकता की राजकीय अपरिहार्यता?
राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह : मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई ः मुंबईसह उपनगरात कामानिमित्त जाणार्‍या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे काही जणांचा गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडून प्रवाशांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. या अपघातांची संख्या मुंब्रा -कळवा दरम्यान वाढल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा एका 25 वर्षीय आयआयटी विद्यार्थ्यांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. अवधेश राजेश दुबे असे मृत तरुणाचे नाव असून तो डोंबिवली ते ठाणे या मार्गातून ट्रेनमधून प्रवास करत होता. अवधेश हा मूळचा पटना येथील असून तो डोंबिवलीच्या ठाकूरवाडी परिसरात वास्तव्यास होता. दिवा आणि ठाणे रेल्वे खाडीदरम्यान रेल्वेतून पडल्याचे समजत आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्राजवळील खाडीत सापडला.

COMMENTS