अहमदनगर/प्रतिनिधी ः नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने नगर-पुणे रस्त्यावरील चास शिवारातील हॉटेल भोलेनाथ
अहमदनगर/प्रतिनिधी ः नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने नगर-पुणे रस्त्यावरील चास शिवारातील हॉटेल भोलेनाथच्या आवारात नेटच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 9 जणांविरुध्द कारवाई केली. या कारवाईत 75 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास करण्यात आली.
विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, अंमलदार रवींद्र शिलावट, बशीर गुलाब तडवी, शेख शकील अहमद, प्रमोद मंडलिक, मनोज दुसाने, सुरेश टोंगारे, सचिन अंधारे, कपिल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुमन विरेंद्र मिश्रा (वय 42, ठाणे भाईंदर वेस्ट, सध्या रा. शिर्डी, ता. राहाता), सचिन भगवान गायकवाड (वय 34, रा. कान्कुरी रोड, आंबेडकर नगर, शिर्डी), हासिम अली खान (वय 45, रा. वसई पालघर, सध्या रा. शिर्डी), अख्तर अहमद नूर अहमद (वय 24, रा. मंसूरगंज, उत्तरप्रदेश, सध्या रा. शिर्डी), बाळू भगवान राजगुरू (वय 55, रा. मानूरवाडी, वडाळा पूर्व, मुंबई शहर), दिनेश रामकृष्ण माळगांवकर (वय 45, रा. लोटस कॉलनी, अब्दुल हमीद मार्ग, गोवंडी, मुंबई तसेच पाहिजे असलेले आरोपी अनिस भाई (रा. औरंगाबाद, पूर्ण नाव माहीत नाही), प्रदीप सरोदे (रा. शिर्डी, पूर्ण नाव माहीत नाही), हॉटेल मालक विजय लांडगे (रा. अहमदनगर, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अहमदनगर ते पुणे प्रवासादरम्यान खासगी लक्झरी बसेसमधील चहा-नाष्टा करीता थांबणार्या प्रवाशांना बोलावून बेकायदेशीरपणे त्या प्रवासी लोकांना जिंकण्याचे प्रलोभन दाखवून तीन पत्त्यांवर लोकांकडून पैसे लावून त्या पत्त्यापैकी एका पत्त्यावर असलेल्या 1 या चित्राचा पत्ता काढून त्यावर हार-जितीचा जुगाराचा खेळ खेळताना व खेळविताना 75 हजार 670 रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हेड कॉन्स्टेबल शकील शेख यांनी फिर्याद दिली आहे.
COMMENTS