Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांवर बोलाल तर गाठ मराठ्यांशी

भाजप आमदार नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा

मुंबई ः मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे सातत्याने आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करतांना दिसून येत आहे. त्यांनी लातूरच्या सभ

आत टाकून दाखवाच, लाट काय असते कळेल ?
मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना
मनोज जरांगे राज्यभर करणार रास्ता रोको

मुंबई ः मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे सातत्याने आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करतांना दिसून येत आहे. त्यांनी लातूरच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका  आहे. फडणवीस मराठा आरक्षणात खोड्या करत आहेत, अशी टीका केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक आहेत. त्यामुळे तेच याच्यात खोड्या करत असल्याचा आरोप जरांगे यांचा आहे. त्यांना उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल बोलत  त्याचे आम्ही स्वागतच करु. परंतु ज्या फडणवीसांनी मराठ्यांना टिकणारे आरक्षण दिले, योजना जाहीर केल्या, त्यांच्या विरोधात भूमिका घ्याल तर गाठ मराठ्यांशी आहे. प्रवीण दरेकर यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, राज्यात शांतता राहावी म्हणून फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली ती चूक झाली असे म्हणायचे का त्यांना? आरे व्वा मग  मराठ्याचा नेता आहे. सध्या तो लोंढा का खोंढा वळवळ करतोय हे सगळेच फडणवीसांच्या ताटात जेवणारे आहेत. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत? ’बघुया.. आहोत शांत तर शांत राहू द्या.. कशाला वातावरण ढवळीता अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

COMMENTS