Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टोमॅटो खातोय भाव तर मिरची झाली अधिक तिखट

शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी - पावसामुळे टोमॅटोसह सर्व भाजीपाला शेतातच खराब झाला आहे.आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या टोमॅटो

खर्डाला मुस्लिम समाजाने  केले पावसासाठी नमाज पठण
भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू
एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – हसन मुश्रीफ

शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी – पावसामुळे टोमॅटोसह सर्व भाजीपाला शेतातच खराब झाला आहे.आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या टोमॅटो मोठा भाव खात असून हिरवी मिरची आर्थिक दृष्ट्या चांगलीच तिखट झाली आहे. भाजीपाला कडाडल्याने बाजारात ग्राहकांची संख्या रोडावली असून डाळींना मात्र स्वयंपाकघरात सध्या अच्छे दिन आले आहेत.
किरकोळ बाजारात टोमॅटो 150 तर हिरवी मिरची 120 रुपये किलो आहे. याशिवाय मेथी 120 रुपये किलो तर दोडके, शेंगा, फूल कोबी, कारले व अन्य भाज्या 60 ते 80 रुपये किलो विकल्या जात आहेत. वाढत्या भावामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने गृहिणींनी काही भाज्यांकडे पाठ फिरविली असून जेवणात कडधान्याचा उपयोग करीत आहेत. सर्वसामान्य नागरिक असो की श्रीमंत सर्वांना दररोजच्या भाजीसाठी टोमॅटो व हिरवी मिरची हमखास लागते मात्र सध्या टोमॅटोला सोन्याचा भाव आला असून त्याचे दर दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. सध्या टोमॅटोने शंभरी पार करून 150 रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. तसेच हिरवी मिरची देखील मागे राहिली नसून ती अधिकची तिखट होत शंभरी पार केली आहे. त्यातच इतर भाजीपाला ही 60 ते 80 रुपयांच्या भावात मिळत असल्याने सर्वसामान्यांना हा भार सोसेनासा झाला आहे. पण खाणं-पिणं तर सोडू शकत नाही ना. त्यासाठी काही जण टोमॅटो व मिरची खरेदी करीत असले तरी सर्वसामान्यांनी मात्र भाजीपाल्याकडे पाठ फिरविले असल्याचे बाजारात पहायला मिळत आहे.

COMMENTS