Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नाळ जुळली तर गावाचा विकास निश्‍चित ः जगधने

विरगाव ग्रामपंचायतने केला 25,000 वृक्षारोपणाचा संकल्प

अकोले/प्रतिनिधी ः  महात्मा गांधी यांचा गावाकडे चला हा संदेश घेऊन आम्ही विरगाव सारख्या ग्रामीण भागात आलो आहे. गावात गेल्याशिवाय गावातील समस्या समज

संगमनेरात पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
साईसंस्थानला आरटीपीआर लॅबसह ऑक्सिजन प्लान्ट करण्याचे आदेश
तुळजाभवानी देवीचा पलंगाच्या प्रवासाला परवानगी मिळावी, भाविकांची मागणी

अकोले/प्रतिनिधी ः  महात्मा गांधी यांचा गावाकडे चला हा संदेश घेऊन आम्ही विरगाव सारख्या ग्रामीण भागात आलो आहे. गावात गेल्याशिवाय गावातील समस्या समजत नाही. गावाशी नाती व नाळ जुळली तर गावाचा विकास निश्‍चित होतो. आम्हाला विरगावमध्ये एक सकारात्मक ऊर्जा व लोकांचा उत्साहाने आम्ही भारावून गेलो. त्यामुळे विरगाव ग्रामस्थांनी कामाची संधी द्यावी. ती कामे पूर्ण करू. असे वक्तव्य डॉर्फ केटल कंपनीचे सी.एस.आर. चे प्रमुख संतोष जगधने यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरेंद्र थोरात होते.यावेळी योगी केशवबाबा चौधरी,अमृतसागर दूध संघांचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे,माजी सरपंच बाळासाहेब मुळे, रंजना पथवे, उपसरपंच जयवंत थोरात, संतोष अस्वले,नामदेव कुमकर, एकनाथ मेंगाळ,सारिका वाकचौरे, जयश्री जोरवर,माया माळी,सरिता राक्षे,ग्रामसेवक व्ही.जी.नेहे,सुनिल वाकचौरे,किसन अस्वले,संपत वाकचौरे,शाहीर रेवन देशमुख,अण्णासाहेब कुमकर, लहानू कुमकर,लक्ष्मण नजान अरुण डोळस ,भगवान अस्वले, सोमनाथ  कुमकर,महेश वाकचौरे, रंगनाथ कुमकर, राजेंद्र अस्वले,भगवान थोरात, अनिल डोळस,नंदकिशोर मेंगाळ, अनिल देशमुख, पंढरीनाथ  वाकचौरे,दत्तात्रय गोर्‍हे, वसंतराव वाकचौरे,बाळासाहेब वाकचौरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.अकोले तालुक्यातील विरगाव ग्रामपंचायत ने 25,000 वृक्षारोपण करण्याचे संकल्प केला असून, या वृक्षारोपण अभियानाला  दि.12 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. या दिवशी वसुधा वंदन उपक्रमांतर्गत 75 देशी वृक्ष लावण्यात आली.
  तर दि. 18 ऑगस्ट रोजी सप्रेम संस्था, मुंबई व डॉर्फ केटल इंडिया कंपनी प्रा.लि.मुंबई  व विरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या टप्प्यात 4,000 केशर आंब्याची लावण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन रोपे वाटप करुन त्यांच्यावर त्याच्या संवर्धनाची जबाबदारी दिली आहे. या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या घरापुढे वृक्षारोपण  केले आहे.याचा शुभारंभ योगी केशवबाबा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.डॉर्फ केटल के. इंडिया प्रा.ली.चे सी.एस.आर.प्रमुख संतोष जगधने,सप्रेम संस्था मुंबईचे डॉ.प्रकाश गायकवाड,सरपंच प्रगती रावसाहेब वाकचौरे,उपसरपंच जयवंत थोरात,अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ढगे,ग्रामसेवक व्ही.जी.नेहे,प्रगतशील शेतकरी महेश वाकचौरे,ग्रामस्थ, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली होती.दि.18 रोजी मेंगाळवाडी,उघडेवाडी येथील जि.प.प्रा.शाळेमध्ये वृक्ष लागवड करण्यात आले.यावेळी अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप  केले.यावेळी शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात यांनी केले.
ग्रामपंचायत हद्दीतील गायरान,पडीक जमीनीवर ग्रामपंचायतच्या वतीने केशर आंब्याची झाडे लावण्यात येणार आहे. त्या माध्यमातून ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास मदतच होणार आहे. – प्रगती रावसाहेब वाकचौरे. सरपंच, विरगाव.

COMMENTS