Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उड सुरेश साबळे यांचे निलंबन तात्काळ मागे घ्या नसता जिल्हाभरात आंदोलन करू : नुमान चाऊस

माजलगाव प्रतिनिधी - बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांनी रुग्णालयाचा कायापालट करत गोरगरिबांना चांगले उपचार मिळावे म्हणून

लेखी आश्‍वासनानंतर श्रीगोंद्यातील वीज प्रश्‍नांवरील आंदोलन स्थगित
गाझामध्ये भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू
संगमनेरच्या उपकारागृहातून चार कैदी फरार

माजलगाव प्रतिनिधी – बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांनी रुग्णालयाचा कायापालट करत गोरगरिबांना चांगले उपचार मिळावे म्हणून रात्रंदिवस काम केले असे डॉक्टर सुरेश साबळे यांची अधिवेशनामध्ये कसल्याच प्रकारची चौकशी न करता, कसलीही पूर्वसूचना न देता निलंबित करण्यात आले. मुळात या भरतीमध्ये डॉक्टर सुरेश साबळे यांचा काडीमात्र संबंध नाही. कारण सदरील भरती शासनाच्या वतीने नेमलेल्या एका कंपनीने केलेली असून त्या गैर-कारभारामध्ये डॉक्टर सुरेश साबळे यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
डॉ.साबळे यांचे वरील निलंबन हे अन्यायकारक आहे कारण बीड जिल्हा सा ऊसतोड कामगारांचा जिल्हा असून गोरगरीब रुग्णांसाठी योग्य उपचार व विविध योजना डॉ. साबळे यांनी राबवल्यामुळे अनेक रुग्ण व गरोदर मातांना याचा फार मोठा फायदा झाला आहे तसेच बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांवर त्यांनी आपली छाप सोडली व शिस्तीस लावले. डॉ. साबळे यांचे निलंबन मागे घ्यावे नसता बीड जिल्ह्यातील हजारो रुग्ण, गरोदर मातांवर हा एक प्रकारचा अन्याय होणार आहे म्हणून सदरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्यावी अशी मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. त्यावेळी उपस्थित जिल्हाअध्यक्ष नुमान चाऊस, समाजसेवक मोहसीन खान, युवा नेते सय्यद सज्जाद राज, निराधार हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ निकम, धम्मपाल देशमाने व आदी उपस्थित होते. डॉ. साबळे विरुद्ध केलेली कारवाई मागे घेण्याबाबत राज्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी (माजलगाव) यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले.

COMMENTS