Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सरकारने आरक्षणावर निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन

मराठा समाजबांधवांनी दिला निवेदनाव्दारे इशारा

पाथर्डी /प्रतिनिधीः मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील सराटी येथे गेल्या आठ ते दहा दि

रक्ताची नाती जीवावर उठली; कोल्हापूरात मुलाच्या मदतीनं सख्ख्या भावाचा काढला काटा l पहा LokNews24
जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शकपदी अशोक (बाबूशेठ) बोरा यांची निवड
बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*

पाथर्डी /प्रतिनिधीः मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील सराटी येथे गेल्या आठ ते दहा दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. सरकारने मराठा आरक्षणावर लवकर निर्णय न घेतल्यास पाथर्डीत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा समाजबांधवानी इशारा दिला आहे. हा इशारा पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे.
निवेदन देते वेळेस यावेळी सोमनाथ बोरुडे,लक्ष्मण डांगे,राजेंद्र बोरुडे,आप्पासाहेब बोरुडे,अण्णा बोरुडे,लाला शेख,सोमनाथ माने,उद्धव माने,विवेक देशमुख,संदीप माने,विष्णूपंत ढाकणे,देवा पवार आदीजण उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर सरकारने पोलिसांच्या माध्यमातून मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी उपोषणात सहभागी झालेल्या आमच्या महिला भगिनीसह आमच्या बांधवांवर गोळ्या झाडल्या.त्यांच्यावर अश्रूधुराचे नळकांडे फोडले. मराठा समाजासाठी कोणीतरी आंदोलन करत आहे हे बघून ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न या राज्याच्या गृहमंत्र्यांनी केला आहे. त्यानंतर त्याचे काय पडसाद उमटले ते देखील सरकारने बघितलेले आहे. आता याबाबत सरकार अद्यापही व सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला तयार नाही. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही. हे अद्यापपर्यंत समजायला तयार नाही. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता खालवली आहे. आठ दहा दिवस झाले तरी देखील सरकार त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. सरकारचे प्रतिनिधी येतात आणि फक्त पोकळ आश्‍वासनाचा पाऊस पाडतात. हे सरकार आपल्याला आरक्षण देईल का नाही. आता हा विश्‍वास सरकारवर राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही पाठिंबा म्हणून आता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. त्याशिवाय झोपलेल्या सरकारला जाग येणार नाही. म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी होणार आहोत. जोपर्यंत सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी मान्य करीत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे चालू राहणार आहे.

COMMENTS