Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ते मेसेज व्हायरल केले तर…याद राखा

पोलिस अधीक्षकांचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी ः अलिकडच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाव्

सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचा मारहाणीत मृत्यू
Sangamner : महुसलमंत्री बाळासाहेब थोरात यांची गंगा माता मंदिर ट्रस्टला भेट (Video)
श्रीगोंद्यातील पाच ग्रामपंचायतीचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर

अहमदनगर/प्रतिनिधी ः अलिकडच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाव्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केले जात आहेत. यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मिडियाव्दारे प्रसारित करू नये, अन्यथा संबंधित व्यक्तींविरुध्द माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 (आयटी अ‍ॅक्ट) अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे.

जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या घटना घडत आहे. नुकतीच शेवगाव तालुक्यात तशी घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक सोशल मिडियाव्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. सायबर पोलिसांचे यावर लक्ष आहे. नागरिक या मजकुराची कोणतीही शहानिशा न करता संबंधित संदेश पुढे पाठवत असतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण होत असते.

कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरून (व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी) आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशा प्रकारचे संदेश कोणतीही खात्री न करता सोशल मीडियाव्दारे प्रसारित करू नये, अन्यथा संबंधितांविरुध्द माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक ओला यांनी दिला आहे.

COMMENTS