गडचिरोली: आजच्या पिढीने केवळ पारंपरिक व्यवसायावर अवलंबून न राहता भविष्यातील जागतिक आव्हाने ओळखून आपले करिअर निवडले पाहिजे. त्यासाठी समाजात वैचारि
गडचिरोली: आजच्या पिढीने केवळ पारंपरिक व्यवसायावर अवलंबून न राहता भविष्यातील जागतिक आव्हाने ओळखून आपले करिअर निवडले पाहिजे. त्यासाठी समाजात वैचारिक क्रांतीची गरज आहे असे प्रतिपादन दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी व्यक्त केले. गडचिरोली येथील गोंडवन आदिवासी संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित मातीचे शिलेदारतर्फे कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थी व प्रतिभावंतांच्या सत्कार सोहळ्यात ’कुंभार समाजापुढील सामाजिक व शैक्षणिक आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते.
पुढे बोलतांना डॉ. सोनवणे म्हणाले की, कुंभार समाजातील तरुणांनी आंबेडकरी विचारांची प्रेरणा घेऊन राज्यकर्ती व प्रशासनकर्ती जमात बनण्याचे ध्येय समोर ठेवले पाहिजे. नवी पिढी ही आव्हाने पेलून समोर जाणारी पिढी आहे, त्यामुळे पारंपरिक व्यवसायातून मार्ग काढून नवी स्वप्ने पाहण्यास त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दगडू कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक अशोक ताटकंटीवार हे होते. यावेळी डॉ. सविता गोविंदवार, दौलतराव वरवाडे, सुधाकर उत्तुरवार, रवींद्र गिरोले व प्रमोद बोरसरे हे मान्यवर उपस्थित होते. डॉ.दगडू कुंभार यांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून भविष्यातील आव्हानांची पायाभरणी करा असे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तर डॉ. सविता गोविंदवार यांनी विद्यार्थ्यांनी स्वत्वाचा शोध घेऊन स्वतःवर काम करायला शिकले पाहिजे असे विचार मांडले.
यावेळी डॉ. अशोक सोनवणे यांना महाराष्ट्रातील सामाजिक व वैचारिक चळवळीतील योगदानाबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पासष्ठ गुणवंत विद्यार्थी व समाजातील सेवाव्रती व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात शर्वरी बोरसरे, तनुश्री गिरवले, गौरी वनीकर, उर्वशी खोबरे यांना प्रथम पुरस्कार तर मोनाली खांदारे, निर्मल कोटांगले, रितेश वरवाडे, अक्षय ठाकूर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय समाजातील पदवीधर व इतर प्रज्ञावंतांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विनायकराव ताटकंटीवार, शेखर शेगमवार, आकाश संगमवार, राकेश चात्रेश्वार , विनोद उरकुंडवार, जोंधरुजी कपाट, दामाजी बोरसरे देवरावजी खोबरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आदेश पातर याचा क्रीडापुरस्कारने विशेष गौरव करण्यात आला. आनंदराव पोटगंटीवार व नामदेव ताटकंटीवार यांना सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निलेश गरपल्लीवार, प्रकाश बोरसरे, शुभांगी खरे, हर्षल रामेलवार, नागेश खोबरे यांचा नव्याने नोकरीस लागल्यामुळे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. संजय गोटमवार व वैशाली गोटमवार यांनी केले. प्रास्ताविक संजय रामगुंडेवार यांनी तर अहवाल वाचन चंदू श्रीकोंडावार यांनी केले. यशस्वीतेसाठी राजेश रामगुंडेवार, प्रशांत चात्रेश्वार, राकेश चात्रेश्वार, शरद मंचलवार, कैलास पुरणकर, गणेश रामगुंडेवार, रामभाऊ बोरसरे, ताराचंद कोटांगले, रामभाऊ खोबरे व मातीचे शिलेदार च्या सर्व कार्यवाहकांनी परिश्रम घेतले.
डॉ. अशोक सोनवणे यांचा समाजरत्न पुरस्कार देवून गौरव
महाराष्ट्रातील सामाजिक व वैचारिक चळवळीतील योगदानाबद्दल डॉ. अशोक सोनवणे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय समाजातील पदवीधर व इतर प्रज्ञावंतांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
COMMENTS