Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंतरावांचे कुटील कारस्थान उध्वस्त करणार : निशिकांत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील यांनी सुसंस्कृतपणाचा मुकुट परिधान केला आहे. त्यांचा मूळ चेहरा व स्वभाव माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांन

सातारा जिल्हा परिषदेच्या 15 शाळा आदर्श बनविणार : ना. शंभूराज देसाई
हुमगाव-बावधन प्रलंबित रस्त्यासाठी चाळीस गाव एकवटले
भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 22 शेळ्यासह एक व्यक्ती जखमी

इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील यांनी सुसंस्कृतपणाचा मुकुट परिधान केला आहे. त्यांचा मूळ चेहरा व स्वभाव माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जगासमोर आणला आहे. प्रकाश हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा दबाव तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर जयंतराव पाटील यांनी आणला होता. जिल्ह्यात अशा प्रकारच्या वैर भावना जपणार्‍या कुटील प्रवृत्तीला स्वाभिमान असलेली व आत्मसन्मान बाळगणारी जनता त्यांचे कारस्थान उधळून लावेल, अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी इस्लामपूर येथील पत्रकार परिषदेत केली.
निशिकांत पाटील म्हणाले, सांगली जिल्हा हा सुसंस्कृत नेत्यांची परंपरा असलेला गणला जातो. यात स्व. वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, लोकनेते राजारामबापू पाटील, स्व. आर. आर. पाटील, जी. डी. बापू लाड, डॉ. पतंगराव कदम, प्रकाशबापू पाटील, डॉ. एन. डी. पाटील यासारख्या अनेक नेत्यांनी राजकीय संहिता जपली. निवडणुकी पुरते निवडणुका त्यानंतर सार्वजनिक कामाला सहकार्याची भुमिका त्यांनी घेतली. त्या तुलनेत जयंत पाटील यांच्या राजकारणाची प्रवृत्ती विरोधकांच्या संस्था उध्दवस्त करणारा नेता ठरत आहे.
निशिकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्य परिवारातील माझा जन्म आहे. स्वकर्तृत्वावर शैक्षणिक व आरोग्य मंदीर उभा केले आहे. हजारो रूग्णांना मोफत उपचार सुरू आहेत. रूग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा मानून कार्य करतो. अशी कार्यपध्दती असून ही जयंतराव हे मंत्री असताना संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा, असा दबाव तत्कालीन पोलीस प्रशासनावर आणत होते, हे सिध्द होत आहे. 70 वर्षाची आई, पत्नी तसेच मागासवर्गीय समाजातील पदाधिकारी असलेल्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांचा दबाव होता. त्यांची ही दृष्ट प्रवृत्ती हद्दपार करणार. जिल्ह्यातील रोहित पाटील, विशाल पाटील, राजेंद्रआण्णा देशमुख, संग्राम देशमुख, स्व. संभाजी पवार यांची मुले यांना ही राजकारणातून उध्दवस्त करण्याचे त्यांची षडयंत्र रचले आहे. स्वाभिमान व आत्मसन्मान बाळगणारी जनता कुटील कारस्थान उधळून लावेल. कोरोना काळात तत्कालीन पोलीस अधिकार्‍यांनी जयंतरावांच्या दबावाला बळी पडून संस्थेंच्या संचालक व पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. त्यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेवून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे निशिकांत पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस प्रसाद पाटील, धैर्यशील मोरे, निवास पाटील, अजित पाटील, मधुकर हुबाले, अशोक खोत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS