मी कधीही पक्षीय राजकारण  केले नाही :-माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी कधीही पक्षीय राजकारण केले नाही :-माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पक्षीय राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करण्याची माझी नेहमी भूमिका असते.यापुढील काळातही खासदार सुजय विखे यांच्या मार्फत

जनसेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी
महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय कौतुकास्पद
‘ये आझादी झुठी है’ चा नारा आजही खरा वाटतो ः अ‍ॅड.नितीन पोळ

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पक्षीय राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करण्याची माझी नेहमी भूमिका असते.यापुढील काळातही खासदार सुजय विखे यांच्या मार्फत निधी उपलब्ध करत विकासाचे राजकारण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.तसेच आगामी काळात बाजारपेठेतील प्रलंबित प्रश्न ही मार्गी लावत शहरातील सौंदर्यात भर घालण्याचे काम करू.शहरातील फुलेनगर,भगवान नगर येथे खासदार डॉ.सुजय विखे यांच्या स्थानिक विकासनिधी अंतर्गत तसेच स्वखर्चाने केलेल्या विकास कामाच्या अनुषंगाने आव्हाड यांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते
तसेच यावेळी पाथर्डी नगरपालिकेच्या हरी पवार,शिवा पवार,पाणी विभागाचे परदेशी,सतीश डोळे,अभिजीत खेडकर,या परिसरातील सर्वच समस्या सोडवण्यासाठी आवर्जून पाठपुरावा करणारे आणि आजचा कार्यक्रम घडवून आणणारे ज्येष्ठ शिंदे काका यांचा ही सन्मान सत्कार करण्यात आला.यावेळी बापूसाहेब गर्जे,नगरसेवक प्रसाद आव्हाड, शिवाजी कराड साहेब, माजी प्राचार्य दीपक गर्जे, बाळासाहेब गोल्हार,सुरेश मिसाळ सर,आर बी फुंदे,सुधिर खेडकर,भारत सुरसे, उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आव्हाड यांनी म्हटले की,बाबुजीच्या सोबत असणारे काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनाही बाबुजीसाठी काही तरी करण्याची इच्छा असल्याने त्यांच्या माध्यमातून एक ते दीड कोटींचा निधी उपलब्ध करून एडके कॉलनी,शिवशक्तीनगर रोडचे काम व प्रलंबित प्रश्न पक्षीय राजकारण बाजूला ठेवत मार्गी लावू.परंतु आता मी तिकडे गेलो तर मी काँग्रेस मध्ये गेल्याची चर्चा होईल.नगरपालिकेच्या तांत्रिक अडचणीमुळे कामात मध्यंतरी अडचणी आल्या.हळूहळू सर्व कामे मार्गी लावू.पाथर्डी शहरवासीयांनी मला भरभरुन प्रेम दिले.या भागाने मला तर प्रेम दिलेच पण माझ्या पाठोपाठ पुतण्या प्रसाद याला ही प्रेम दिले.भविष्यात तुमच्या प्रेमाचा उतराई होण्याचा प्रयत्न करेल.

         यावेळी श्रीकृष्ण खेडकर मनोगत करताना म्हटले की,मागील पंचवार्षिक काळात पाथर्डी शहरातील भगवान येथे विद्यमान नगराध्यक्ष यांचा सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.त्यावेळी त्यांच्याकडे एक दोन कामाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये विजेच्या मुख्य लाइनला दोन ठिकाणी बल्फ बसवण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु त्यासाठी नगरपालिकेत निधी उपलब्ध आहे हे पाहावे लागेल असे उत्तर विद्यमान नगराध्यक्ष यांनी दिले होते.तर याउलट माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्याकडे भूमिगत गटारीच्या कामाची मागणी केली असता कुठल्याही निधीची वाट न पाहता तात्काळ काम सुरू केले.असा व्यक्तीचा गुणगौरव करायला हवा म्हणून हा सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.चांगल्याला चांगलं म्हणणे व वाईटाला वाईट म्हणणे ही आपण सुशिक्षित असण्याची ओळख आणि ताकत आहे.आणि जर आपण असे करत नसू तर आपण सुशिक्षित कसे?येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या कामाच्या व योग्य नेतृत्वाच्या म्हणजे तुमच्या पाठीशी नेहमी उभे आहोत अशी या परिसराच्या वतीने ग्वाही देतो असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मिसाळ व श्रीकृष्ण खेडकर यांनी तर आभार महादेव पालवे यांनी मानले.

COMMENTS