छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरातील किराडपुरा राम मंदिर येथे भेट दिली. यावेळी ते म्हणाले

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरातील किराडपुरा राम मंदिर येथे भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मागच्या महिन्यापासून शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी करत आहेत. हिंदू मुसलमान अशा पद्धतीचे काम मागच्या महिन्यापासून सुरू आहे. याबाबतीत वारंवार शासनाला सांगितले आहे. गृहमंत्र्यांना पण सांगितले आहे आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे घडायला नको पाहिजे होतं ते रात्री घडले आहे. पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेणे यामध्ये गरजेचे आहे. गोड बोलणे समजून सांगणे एवढ्यावर न थांबता पोलिसी खाक्या दाखवाव्या मी पदाधिकारी मेळाव्यात सुद्धा याबाबतीत बोललो होतो. मला माहिती होती म्हणून मी पोलिसांना पोलिस यंत्रणा इतरांना सांगितली होती. पोलिस परवानगी नसलेल्या मोर्चामध्ये राजकीय पक्षातील या काही नेते मंडळी सामील होतात. शहराचं वातावरण खराब करण्यासाठीच, यामध्ये पोलिसांचं अपयश आहे, अशी टीका यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलीळ आहे.
COMMENTS