Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतीची पत्नीच्या अंगावर अ‍ॅसीड टाकण्याची धमकी

पुणे ः माझ्या मोबाईलला हात लावल्यास तुझे हात तोडून टाकेल अशी धमकी देऊन तुला मुले पाहीजे असतील तर दहा लाख रूपये द्यावे लागतील म्हणत पत्नीच्या अंगा

तो मृत्यु उष्माघातानेच झाला
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठी घटना
जामखेड बस स्थानकावरून विवाहिता बेपत्ता

पुणे ः माझ्या मोबाईलला हात लावल्यास तुझे हात तोडून टाकेल अशी धमकी देऊन तुला मुले पाहीजे असतील तर दहा लाख रूपये द्यावे लागतील म्हणत पत्नीच्या अंगावर अ‍ॅसीड टाकण्याची धमकी देणार्‍या पतीसह सासरच्यांविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पती झमा काझी, शबनम काझी, वफा काझी (रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 26 वर्षीय महिलेनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहीत महिलेला तुझ्या आई-वडीलांनी लग्नात मान पान दिला नाही, घरातील कोणतेही काम येत नाही, तुझ्या अंगामध्ये कोणताच चांगला गुण नाही, असे वारंवार टोमणे मारून शिवीगाळ केली. तसेच मारहाणही केली. तर पतीने तिला माझ्या मोबाईलला हात लावला तर तुझा हात तोडून टाकेल अशी धमकी दिली. तुला मुले हवी असतील तर 10 लाख रूपये द्यावे लागतील म्हणून अंगावर अ‍ॅसिड टाकण्याचीही धमकी दिली. तसेच विवाहिता त्रास सहन करूनही तिला सासरच्यांकडून सांभाळण्यासाठी नकार दिला जात असल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे. 

COMMENTS