Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत पतीचा गळा दाबून खून

अनैतिक संबंधातून कृत्य ; पत्नी व प्रियकर अटकेत देवळाली प्रवरा : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. ही घटना २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कणगर परिसरात घडली. राहुरी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला तात्काळ अटक करत जेरबंद केले आहे.  दि. २३ जानेवारी २०२६ रोजी कणगर परिसरातील वनविभागाच्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, संभाजी बडे आणि चालक शकूर सय्यद यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुरुवातीला या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.  मात्र मृत्यू संशयास्पद असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पहाटेच्या सुमारास मयताची पत्नी अनिता सुधाकर थोरात हिला भेंडा येथून ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिचा प्रियकर आरोपी ज्ञानेश्वर सागर याला साकूर-मांडवा येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.  मयत सुधाकर किसन थोरात (वय ४०, रा.उक्कलगाव, ता.श्रीरामपूर) यांच्या पत्नी अनिता हिचे आरोपी ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधात सुधाकर अडसर ठरत असल्याने अनिता हिच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वर याने २२ जानेवारी रोजी सुधाकर यांना दवाखान्यात जाण्याचा बहाणा करून राहुरी येथे आणले. त्यानंतर कणगर परिसरातील वनविभागाच्या जागेत नेऊन उपरण्याने गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.  या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मुलीला जमिनीच्या वादातून जिवंत गाडण्याचा प्रयत्न
पाथर्डी पोलिसांची कामगिरी;  २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
जामखेडमध्ये ड्रग्ज कनेक्शन ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त 
xr:d:DAF1XU2IAWM:54,j:8318560495602170102,t:23121118

अनैतिक संबंधातून कृत्य ; पत्नी व प्रियकर अटकेत

देवळाली प्रवरा : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. ही घटना २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कणगर परिसरात घडली. राहुरी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला तात्काळ अटक करत जेरबंद केले आहे.

 दि. २३ जानेवारी २०२६ रोजी कणगर परिसरातील वनविभागाच्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, संभाजी बडे आणि चालक शकूर सय्यद यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुरुवातीला या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 मात्र मृत्यू संशयास्पद असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पहाटेच्या सुमारास मयताची पत्नी अनिता सुधाकर थोरात हिला भेंडा येथून ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिचा प्रियकर आरोपी ज्ञानेश्वर सागर याला साकूर-मांडवा येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

 मयत सुधाकर किसन थोरात (वय ४०, रा.उक्कलगाव, ता.श्रीरामपूर) यांच्या पत्नी अनिता हिचे आरोपी ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधात सुधाकर अडसर ठरत असल्याने अनिता हिच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वर याने २२ जानेवारी रोजी सुधाकर यांना दवाखान्यात जाण्याचा बहाणा करून राहुरी येथे आणले. त्यानंतर कणगर परिसरातील वनविभागाच्या जागेत नेऊन उपरण्याने गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

 या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS