Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतीने झोपेतच केली पत्नी आणि सासूची हत्या

अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आर

मोबाईलवर जोरात बोलल्याच्या रागातून एकाचा खून
जेवणात भात न केल्यामुळे रागातून झालेल्या भांडणात पतीने पत्नीची हत्या केली
शेतीच्या वादातून शेतकर्‍याची निर्घुण हत्या.

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीने रात्री झोपेत असतानाच पत्नी आणि सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडच्या सहाय्याने प्रहार करुन दोघांचा खून केला आहे. पत्नी आणि सासूला संपल्यानंतर आरोपी पतीने घरातून पळ काढला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत पत्नी नूतन सागर साबळे (वय 23 वर्षे) तर सासू सुरेखा दिलीप दांगट (वय 45 वर्षे) अशी मयतांची नावे आहेत. राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सागर सुरेश साबळे याने राहत्या घरात पत्नी आणि सासू या झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून दोघांची हत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय.

COMMENTS