दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळे पतीची हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळे पतीची हत्या.

राणी ज्ञानी यादव असे आरोपी पत्नीचे नाव.

नागपूर प्रतिनिधी -  दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीची पत्नीने गळा आवळून व लोखंडी सळाखीने डोक्यावर वार करून हत्या केल्याची घटना कळमना( Kaḷamanā) भ

दोन मैत्रिणींच्या मदतीने पतीच्या प्रियसीची केली हत्या
एकलहरे दरोड्यात पत्नीनेच केला पतीची गळा आवळून खून
भाऊजीने केला मेहुण्याचा खून

नागपूर प्रतिनिधी –  दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीची पत्नीने गळा आवळून व लोखंडी सळाखीने डोक्यावर वार करून हत्या केल्याची घटना कळमना( Kaḷamanā) भागात उघडकीस आली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. राणी ज्ञानी यादव(Rani Gyani Yadav) (वय ३५), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्नीचे, तर ज्ञानी मनराखन यादव(Gnani Manrakhan Yadav) (वय ३८) असे मृताचे नाव आहे. हत्या केल्यानंतर नवऱ्याने शिलाई मशीन वर डोकं आपटून आत्महत्या केल्याची माहिती परिसरात दिली. पोलिसांनी देखील त्याची नोंद घेतली. मात्र शवविच्छेदन अहवालात सत्य समोर आल्याने पोलिसांनी आरोपी पत्नी राणीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

COMMENTS