Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या खूनानंतर पतीची आत्महत्या

Oplus_16908288 Oplus_16908288 म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील हिंगणी गावात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या क

म्हसवडमधील अतिक्रमन विरोधी कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरु
गोवा बनावटीच्या दारूचा ट्रक पकडण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश
शिरोली एमआयडीसीतील कंपनीवर कारवाई; 123 बालमजुरांची सुटका

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील हिंगणी गावात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेपासून ते बुधवारी 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत बंडु अंकुश घुटुकडे (रा. हिंगणी, ता. माण) याने आपल्या पत्नी आनिता बंडु घुटुकडे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात लाकडी दांडा व लोखंडी घनाने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आनिताचा मृत्यू झाला.
यानंतर आरोपी बंडु घुटुकडे याने स्वतः विषारी औषध प्राशन करून पत्र्याच्या शेडच्या अँगलला रबरी पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुहेरी घटना हिंगणी गावच्या आसळओढा परिसरातील त्यांच्या राहत्या घराजवळ घडली. या प्रकरणी ज्ञानेश्‍वर वस्ताद झिमल (रा. गंगोती, ता. माण) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, तसेच सपोनि अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS