Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरेगाव सोसायटी बँक पातळीवरील शंभर टक्के वसुली

कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे यांची माहिती

कोपरगाव तालुका ः तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकर्‍यांची कामधेनु असलेल्या सुरेगाव सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांनी त्यांच्याकडील 2 कोटी 62 लाख रू

गृहभेटीच्या माध्यमातून मतदानाचे प्रमाण वाढवूया
निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकल्या
वाळकी येथे भरदिवसा डोक्यात दगड घालून 35 वर्षीय तरुणाचा खून

कोपरगाव तालुका ः तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकर्‍यांची कामधेनु असलेल्या सुरेगाव सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांनी त्यांच्याकडील 2 कोटी 62 लाख रूपयांचे कर्ज शंभर टक्के भरत 30 जुन अखेर सोसायटी बार केली अशी माहिती सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सोसायटीचे मुख्य प्रर्वतक विलासराव वाबळे यांनी दिली.
           पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मोहनराव वाबळे यांचे नेतृत्वाखाली सुरेगांव सोसायटीने मागील कर्ज वसुलीत तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे तर चालु खरीप हंगामात सभासद शेतक-यांना 2 कोटी 76 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. याकामी जिल्हा सहकारी बँक कोपरगांवचे तालुका विकास अधिकारी अविनाश काटे, वसुली विभागाचे श्री. लोहकरे, बँक निरीक्षक वीरेश गाडे यांचे विशेष सहकार्य मिळाले. सोसायटीचे अध्यक्ष गणेश वाबळे, उपाध्यक्ष गोरख कदम व सर्व संचालकांनी सर्व कर्जदार सभासदांना घरोघर जाउन कर्ज रक्कम भरण्याबाबत वेळोवेळी सुचना केल्या. याकामी सर्वश्री पांडुरंग वाबळे, रामभाऊ वाबळे, सोपानराव सोनवणे, रामनाथ वाबळे, छबुराव माळी, धोंडीराम वाबळे, दिगंबर कदम, शांताराम मेहेरखांब, दिपक हुडे, सुदाम निकम, शंकर कदम, विनायक कदम, शरद मेहेरखांब, जगन सोनवणे, दिलीप मेहेरखांब, उत्तम निकम यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. सचिव शांताराम कदम यांनी शेवटी आभार मानले. सुरेगांव सोसायटीच्या व्यवस्थापनांने चालु खरीप हंगामात शेतक-यांना उद्भवणार्‍या अडचणीचे निराकरण केले.

COMMENTS