Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांना 42 जागा कशा मिळाल्या ? : राज ठाकरे

मुंबई ः भाजपला 2014 आणि 2019 मध्ये देखील 100 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या ते समजू शकतो, मात्र अजित पवारां

आश्रमशाळा कर्मचार्‍यांचा जुन्या पेन्शनसाठी संप सुरूच
क्रिप्टोकरन्सीवर वित्तमंत्र्यांचा प्रहार!
‘टायगर 3’ च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत
Raj Thackeray speech slams Ajit Pawar says how NCP win 42 seats in  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Raj Thackeray: 1 खासदार असणारे  अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज

मुंबई ः भाजपला 2014 आणि 2019 मध्ये देखील 100 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या ते समजू शकतो, मात्र अजित पवारांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्‍वास बसू शकतो का? असा प्रश्‍न मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपस्थित करत विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईतील वरळीत मनसेच राज्यस्तरीय मेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होेते.
यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, मतदानाच्या आकडेवारीवर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे. केवळ ते आपल्यापर्यंत आलेले नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले. मात्र केलेले मतदान हे कुठेतरी गायब झाले. अशा प्रकारे जर निवडणूक लढवायच्या असतील तर निवडणूक न लढवलेल्या बरे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले. अर्थात काही दिवसात ही गोष्ट संपेल. कोणीही अमर पट्टा घेऊन आलेला नाही, अशा गोष्टी होत असतात, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्या शरद पवार यांच्या जीवावर आजपर्यंत अजित पवार आणि छगन भुजबळ राजकारण करत आले. त्या शरद पवार यांना केवळ दहा जागा मिळतात? हे न समजण्याची गोष्ट असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. चार महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आले आहेत. एका खासदारांच्या अंतर्गत सहा आमदार निवडून येतात. मात्र सर्वांच्या सर्व नाही पकडले तरी देखील आमदारांची संख्या वाढायला हवी होती. मात्र त्यांचे केवळ 15 आमदार निवडून येतात? यावर राज ठाकरे यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. शरद पवार यांचे आठ खासदार निवडून आले होते. त्यांचे केवळ दहा आमदार निवडून येतात? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. ज्या लोकसभेत अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतो. त्या अजित पवार यांचे 42 आमदार कसे निवडून आले? असा प्रश्‍न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मात्र हे का झाले? कशामुळे झाले? हा संशोधनाचा विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी ’छावा’ चित्रपटावर देखील भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहे. तर संभाजी महाराज आमचे बलिदान आहेत. ’छावा’ चित्रपटाच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला असल्याच मला अमेय खोपकर यांनी सांगितले. त्यासंदर्भात तुम्हाला निर्मात्यांना भेटायचे आहे. त्यानंतर मी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. दुसर्‍या दिवशी ते मला भेटायला आहे. अर्थात लेझीम हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि संभाजीराजेंनी कधीतरी हातात लेझीम घेतलीही असेल, काय माहिती? इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल. मी त्यांना विचारले की, त्या एका गाण्याने चित्रपट पुढे सरकतोय का? की नुसते सेलिब्रेशनचे गाणे आहे? त्यावर ते म्हणाले की फक्त सेलिब्रेशनचे गाणे आहे. मग म्हटले, त्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावताय?, असे राज ठाकरे म्हणाले.


स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात देखील राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला लांबला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांना सध्या जास्त खर्च न करण्याचा सल्ला दिला आहे. आताच सर्व खर्च करताल आणि नंतर मात्र रिकाम्या खिश्याने माझ्यासमोर येताल, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

COMMENTS