Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘हाऊसफुल 5’ ची घोषणा ; दिवाळीत होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘हाऊसफुल’ या कॉमेडी चित्रपटाच्या सीरिजने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. २०१० साली प्रदर्शित झालेल्

जनमताचा कौल अनाकलनीय ! 
सरपंचाच्या गाडीवर गोळीबार, सरपंच थोडक्यात बचावले | LOK News 24
राजकारण-भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘हाऊसफुल’ या कॉमेडी चित्रपटाच्या सीरिजने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सिक्वेलही प्रेक्षकांच्या तितकेच पसंतीस उतरले होते. ‘हाऊसफुल’ चित्रपटाप्रमाणेच त्याचे इतर तीनही सिक्वेलह हीट ठरले होते. आता लवकरच ‘हाऊसफुल ५’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने ‘हाउसफुल ५’ बाबत मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हाउसफुल ५’ चे पोस्टर प्रदर्शित केले आहे. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित करणार याबाबत हिंटही दिली आहे. २०२४ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हाउसफुल ५’ मध्ये पाचपट जास्त वेडेपण असेल असा दावा अक्षय कुमारने केला आहे. ‘हाऊसफुल ५’ चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार आहेत. तर साजिद नाडियावाला या चित्रपटाचे निर्माती करणार आहेत. चित्रपटात अक्षयबरोबर रितेश देशमुखही झळकणार आहे. मात्र, अक्षय़ आणि रितेश व्यतरिक्त कोणकोणते कलाकार या चित्रपटात असतील याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. २०१० साली ‘हाऊसफुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांनतर २०१२ आणि २०१६ साली या चित्रपटाच्या सीरिजमधील दुसरा आणि तिसरा भाग प्रदर्शित करण्यात आला होता. ‘२०१९’ मध्ये ‘हाऊसफुल ४’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा पुढच्या भागाचा विचार निर्माते करत होते. आता लवकरच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा तीच धमाल, कलाकारांचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

COMMENTS