चंद्रपूर प्रतिनिधी - कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला होणारे मजुरांचे स्थलांतर ही काही नव

चंद्रपूर प्रतिनिधी – कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला होणारे मजुरांचे स्थलांतर ही काही नवी बाब नाही. मात्र, शनिवारी पहाटे अशाच एका मजुरांच्या जत्थ्याचा चंद्रपूर जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली. गावात हातांना काम नसल्याने राज्याची सीमा ओलांडणाऱ्या मजुरांवर काळ कोपला. छत्तीसगड येथून हैदराबादकडे मजुरांना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स पलटली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर बारा जण गंभीर जखमी झालेत. छत्तीसगड वरून मजुरांना घेऊन घेऊन हैदराबादकडे निघालेली ट्रॅव्हल्स चंद्रपुर जिल्ह्यातील विरुर- धानोरा मार्गावर पलटली. ही घटना पहाटे पाज वाजण्याच्या सुमारास घडली. या ट्रॅव्हल्समध्ये ३० मजूर प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळतातच विरूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. जखमींना उपचारासाठी विरुर, राजुरा, चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसचालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS