Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आव्हाड महाविद्यालयातील बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पाथर्डी ः बाबूजी आव्हाड महाविद्यालयात आज इयत्ता 12 बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावर्षी विज्ञान शाखेचा निका

आव्हाड महाविद्यालयात इंग्रजी निबंध स्पर्धा उत्साहात
पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालया कडून सत्कार
आविष्कार स्पर्धेत आव्हाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

पाथर्डी ः बाबूजी आव्हाड महाविद्यालयात आज इयत्ता 12 बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावर्षी विज्ञान शाखेचा निकाल 92.72 टक्के, वाणिज्य शाखेचा 92.15 टक्के, तर कला शाखेचा निकाल 71.87 टक्के लागला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे होते. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना जीवनात योग्य ध्येय ठेवून प्रामाणिकपणे मेहनत करा व यशस्वी व्हा असा मूलमंत्र दिला.महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी पालक प्रतिनिधी वांढेकर तर विद्यार्थी प्रतिनिधी कु.सानिका वांढेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
         विज्ञान शाखेमध्ये कु. वांढेकर सानिका भानुदास (84.50), कु.चितळे श्रद्धा विद्यासागर (83.00), कु.खंडागळे शलाका दीपक (82.33) वाणिज्य शाखेमध्ये चि. देशमुख स्पंदन अमोल(78.50), कु. बांगड रिद्धी कमलेश (75.00), कु.गांधी लाभश्री अभय.(73.00), तर कला शाखेमध्ये कू.दहिफळे प्रांजल ज्ञानदेव (70.50), जवरे विशाल रमेश (70.17), आंधळे प्रतीक्षा  वासुदेव (66.67) यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.मन्सूर शेख तर आभार प्रा. देवेंद्र कराड यांनी मानले.

COMMENTS