Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केसुला बहुउद्देशीय संस्थेतर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

पत्रकारांच्या लेखणीमुळेच जनसामान्यांना न्याय मिळतो - प्रफुल जाधवमाहूर । प्रतिनीधीपत्रकारांच्या लेखणीमुळेच जनतेच्या समस्या, अडचणी सुटून जनसामान्यां

माहूर शहारात कर्णकर्कश आवाजाचे फटाके फोडत बुलेट सुसाट! पोलिसांचे दुर्लक्ष
माहूर तालुक्यातील नागरिकांनी जनता दरबारात तक्रारी मांडाव्यात -आ.केराम
माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीची श्री बालांबिका देवी (Video)

पत्रकारांच्या लेखणीमुळेच जनसामान्यांना न्याय मिळतो – प्रफुल जाधव
माहूर । प्रतिनीधी
पत्रकारांच्या लेखणीमुळेच जनतेच्या समस्या, अडचणी सुटून जनसामान्यांना न्याय मिळतो, असे प्रतिपादन केसुला बहुउद्देशीय संस्था, ईवळेश्वरचे अध्यक्ष प्रफुल जाधव यांनी केले.
6 जानेवारी दर्पण दिनाचे औचित्य साधून केसुला बहुउद्देशीय संस्था, ईवळेश्वर यांच्यावतीने माहूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.  9 जानेवारी रोजी  माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळा येथे हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयकुमार अडकीने, तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी, विजय आमले, प्रा. प्रवीण बिरादार, साजिद खान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रफुल जाधव म्हणाले की, प्रशासनातील किंवा सत्तास्थानी असलेली एखादी प्रभावशाली व्यक्ती जेव्हा अधिकारांचा दुरुपयोग करते, तेव्हा तिला वठणीवर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. राजकीय नेते अनेकदा निवडणुका जिंकण्यासाठी गोड बोलतात व वेळेच्या सोयीनुसार भूमिका बदलतात; मात्र पत्रकार हा चोवीस तास सजग राहून निस्वार्थपणे जनसेवा करीत असतो. त्यामुळे समाजावर पत्रकारांचे मोठे ऋण असून त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. याच भावनेतून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात राज ठाकूर, मनोज कीर्तने, अपील बेलखोडे, नितेश बनसोडे, दत्ता शेरेकर, विश्वास पंडागळे, संजय सोनटक्के, सचिन बेहेरे, प्रा. विनोद कांबळे, संजय बनसोडे, अनिल माडपेलीवार, पद्मा गिर्‍हे, सुरेखा तळणकर, राजिक शेख, राजू दराडे यांच्यासह शेकडो पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप राठोड व कुणाल राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन यादव आडे व उपसरपंच मच्छिंद्र पार्डी यांनी केले.

COMMENTS