अकोले/प्रतिनिधी ः हर घर तिरंगा या अभियांनातर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला असून , अकोले ता
अकोले/प्रतिनिधी ः हर घर तिरंगा या अभियांनातर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला असून , अकोले तालुक्यातील विरगाव येथे ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
या निमित्ताने सरपंच प्रगती रावसाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विरगावच्या वतीने आजी व माजी पोलिसांचा व आर्मी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या विरांचा,स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारतील सदस्य यांचा शाल,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रगती वाकचौरे होत्या. यावेळी अमृतसागर दूध संघांचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे,माजी सरपंच बाळासाहेब मुळे, माजी सरपंच रंजना पथवे,उपसरपंच जयवंत थोरात,नामदेव कुमकर,वाल्मिक देशमुख,संतोष अस्वले,सुनील वाकचौरे, माया माळी,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व्ही.जी.नेहे,ग्रामस्थ व आजी व माजी पोलिस व आर्मी सैनिक आणि त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन थोरात यांनी केले.
COMMENTS