कोपरगाव प्रतिनिधी ःआदिवासी समाजाचा प्रामाणिकपणा व इमानदारी हीच कवच कुंडले असून, त्यामुळे हा समाज आजही समाजात सन्मानाने व विश्वासाने जीवन जगत असल

कोपरगाव प्रतिनिधी ःआदिवासी समाजाचा प्रामाणिकपणा व इमानदारी हीच कवच कुंडले असून, त्यामुळे हा समाज आजही समाजात सन्मानाने व विश्वासाने जीवन जगत असल्याचे वक्तव्य कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी जागतिक आदिवासी दिन आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील सर्व आदिवासी कर्मचार्यांनी एकत्र येत जागतिक आदिवासी दिन मोठया जल्लोषात साजरा केला. याप्रसंगी आदिवासी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक महारु चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पो.नि. शेवंगावचे किशोर पावरा, नायब तहसीलदार कोपरगाव राजेंद्र चौरे, सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी देविदास गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळू बांडे, डॉ.गणेश ठोंबरे, आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे, ज्ञानेश्वर वाकचौरे आदी मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
पुढे बोलताना पो.नि.देसले यांनी सांगितले की, आदिवासी समाज कायमच शांतताप्रिय व समाजहिताचे काम करणारा आहे. समाजाला कधीही त्रास देणारे वर्तन केलेले नाही.स्वातंत्र्यकाळामध्ये आदिवासी समाजातील स्त्री-पुरुषांनी केलेले कार्य कौतुकास्पद व पराक्रमाने भरलेले आहे. आदिवासी समाजातील समस्यांकडे जगाने व्यापक दृष्टीने पहावे.समाजातील प्रत्येक शिकलेल्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या नोकरदार वर्गाने आपल्या समाजातील सर्व घटकांना प्रगती पथावर आणण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे.त्याची सुरुवात कोपरगाव येथील सर्व आदिवासी कर्मचार्यांनी एकत्र येऊन केलेली आहे. ही सुरुवात कौतुकास्पद आहे. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर शिंदे यांनी केले. तर आभार रयत शिक्षक बँकेचे संचालक दिपक भोये यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पोरे व नारायण चौरे यांनी केले. कार्यक्रमासाठी तालुक्यातून सुमारे चारशे कुटुंब सहपरिवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व आदिवासी कर्मचारी बांधवांनी प्रयत्न केले.
COMMENTS