Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास यश मिळतेच

तालुकाप्रमुख तुकाराम येवले

माजलगाव प्रतिनिधी - कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास यश मिळतेच असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले यांनी केले तर समाजाची

भिवंडीमध्ये फर्निचरच्या शोरूम सह कारखान्यास भीषण आग | LOKNews24
छत्रपती प्रतिष्ठानच्या पारितोषिकांचे 9 एप्रिलला वितरण
बीड शहरात एकलव्य भिल्ल समाज संघटनेची मोटारसायकल रॅली

माजलगाव प्रतिनिधी – कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास यश मिळतेच असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले यांनी केले तर समाजाची प्रगती करायची असेल तर समाज संघटना मजबुत करा असे आवाहन शामसुंदर दळवी यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हाउपाध्यक्षपदी दिलीप झगडे यांच्या निवडीबद्दल नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शहरातील संतसेना महाराज नाभिक सभागृहात दि. 2 एप्रिल रोजी स. 11. वा. आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थांनी शामसुंदर दळवी हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन तालुकाप्रमुख तुकाराम येवले, किशोर दळवी,  यांची उपस्थिती होती. संतसेना महाराज व भारतामाता प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. समाजबांधवांच्या वतीने पत्रकार दिलीप झगडे, डॉ. शुभम दळवी, इंजि. मुकुंद हजारे, कवी बालाप्रसाद चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना श्री. झगडे म्हणाले की, समाजाने दिलेल्या आशिर्वादामुळेच मी आजपर्यंत यशस्वी काम करू शकलो. भविष्यात देखिल समाजाच्या प्रश्नावर प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बोलतांना येवले म्हणाले की, या देशामध्ये स्वातंत्र्यांचा अमृमहोत्सवी वर्ष साजरे करत असतांना या देशात जनावरांची, मुक्या प्राणी, जंगली प्राण्यांची जनगणना केली जाते परंतु ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणा केली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी भास्कर खटले, डॉ. माधव वाघमारे, राजकुमार झगडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास निळकंठ सोळंके, सचिन धपाटे, हनुमंत जाधव, सचिन मोती, अनिल दळवी, अनिल झगडे, गंगाभिषण झगडे, संतोष चव्हाण, धोंडीराम सवणे, गोपिनाथ झगडे, विजय दळवी आदि समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव लांडगे यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम शिंदे तर आभार बालाप्रसाद चव्हाण यांनी मानले.

COMMENTS