मुंबई/प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांचा डबलगेम असल्याचे वक्तव्य केल्

मुंबई/प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांचा डबलगेम असल्याचे वक्तव्य केल्यानंतर पवार काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र यावर बोलतांना
राज्याच्या गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्ये करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे असा टोला शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी गुरुवारी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. पवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिंतेचा बनला आहे. माहिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला आणि मुलींवरील हल्ले वाढले आहेत. 23 जानेवारी ते 23 मे दरम्यान ठाण्यातून 721 महिला बेपत्ता झाल्या, तर पुण्यातून 937 महिला गायब आहेत. याच काळात मुंबईतून 738 महिला बेपत्ता आहेत. पवारांनी राज्यातील महिलांची देखील आकडेवारी मांडली. सोलापूरमधून 62 बेपत्ता आहेत. सगळ्या मिळून 2,458 मुली आणि महिला या चार महापालिका क्षेत्रात गेल्या सहा महिन्यात गायब झाल्या आहेत. पुणे ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, बीड, चंद्रपूर, जळगाव, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदिया या 14 जिल्ह्यात 23 जानेवारी ते 23 मे हा सर्व काळ आणि त्यानंतर 4421 मुली बेपत्ता आहेत, असे पवार म्हणाले. पवार म्हणाले, राज्यातून गेल्या दीड वर्षात 6 हजार 889 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्ये करण्यापेक्षा या महिला कशा बेपत्ता झाल्या? त्यांचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली कशा करता येईल यासाठी उपाय करावेत असे पवार म्हणाले.
COMMENTS