Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाचा फटका, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दिवस राहणार बंद

नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काल नंदुरबार कृषी उत्पन्न

महाबळेश्‍वर तालुक्यात मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले
तासगावसह नागेवाडी कारखान्याचे 12 कोटीचे धनादेश शेतकर्‍यांना देण्यात आले
शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध; राष्ट्रवादी-14 तर भाजप 4 राष्ट्रवादीची सत्ता कायम

नंदुरबार प्रतिनिधी – नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काल नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी कडधान्य आणि गहू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले होते. मात्र सायंकाळी पाच वाजता पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यात विक्रीसाठी आलेला आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला धान्य ओले झाल्याने नुकसान झाले होते. तसेच अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा जोर जिल्ह्यात कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने नंदुरबार बाजार समितीतील खरेदी विक्री दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर ही शेतीमाल कुठे सुरक्षित ठेवावा हा प्रश्न उभा राहिला आहे.

COMMENTS