Homeताज्या बातम्यादेश

मिचाँग चक्रीवादळापूर्वीच फटका

तमिळनाडू-आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस

चेन्नई ः बंगालच्या उपसागरावर तयार झालेले मिचाँग चक्रीवादळ तामिळनाड आणि आंध्रप्रदेशच्या समुद्र किनार्‍यावर धडकण्यापूर्वीच वेगवान वार्‍यामुळे मुसळध

वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू
साईराज प्रतिष्ठानची दहीहंडी उत्साहात
शहरातील एलआयसीच्या 68 इमारती धोकादायक!

चेन्नई ः बंगालच्या उपसागरावर तयार झालेले मिचाँग चक्रीवादळ तामिळनाड आणि आंध्रप्रदेशच्या समुद्र किनार्‍यावर धडकण्यापूर्वीच वेगवान वार्‍यामुळे मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. या वादळाच्या वार्‍यांचा वेग ताशी 90 किलोमीटर इतका आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळाने तमिळनाडूत हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते आणि घरे पाण्याखाली बुडाली आहेत.
मुसळधार पाऊस आणि वेगवान वार्‍यामुळे किनार्‍यालगतच्या भागांमध्ये अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, रस्ते बंद आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच लोकांनी घरून काम करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणाहून दरडी कोसळल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर चेन्नई विमानतळ बंद करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत 6 नागरिकांचा बळी घेतला आहे. चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी सकाळी 3 वाजल्यापासून मुसळधार पाऊस चालू आहे. तमिळनाडूचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री के. एस. एस. आर. रामचंद्रन यांनी चक्रवादळामुळे राज्यात आतापर्यंत सहा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. रामचंद्रन महणाले, बस अपघातात हे सहा बळी गेले आहेत. झाड पडून, पूर किंवा वीज पडून कुठेही जीवितहानी झालेली नाही. चेन्नईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस चालू असून सोमवारी सकाळी ईस्ट कोस्टल रोडवरील एक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत्य झालेले दोघे मूळचे झारखंडचे होते. शेख अफराज आणि एम. डी. तौफिक अशी मृतांची नावे आहेत.

आज धडकणार चक्रीवादळ- हवामान विभागाच्या विशाखापट्टणम् वादळ इशारा केंद्राच्या व्यवस्थापकीय संचालिका सुनंदा यांनी सांगितले, की बंगालच्या उपसागराच्या र्नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा 18 किलोमीटर प्रतितास वेगाने पश्‍चिम-वायव्य दिशेने सरकला. हे वादळ 2 डिसेंबर रोजी पुद्दुचेरीच्या 440 किमी पूर्वेकडे, चेन्नईच्या पूर्व-आग्नेय दिशेला 450 किमी, नेल्लोरच्या आग्नेय-पूर्व दिशेने 580 किमी, बापट्लाच्या 670 किमी आग्नेय-पूर्व आणि मछलीपट्टणमच्या दक्षिण-आग्नेय दिशेस 670 किमीवर होते, हे चक्रीवादळ पश्‍चिम-वायव्य दिशेने सरकण्याची आणि काही तासांत बंगालच्या उपसागरात र्नैऋत्य भागात तीव्र होण्याची शक्यता आहे.

COMMENTS