नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारताची महत्वाकांक्षही चांद्रयान-3 मोहीम बुधवारी यशस्वी झाली आहे. चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारताची महत्वाकांक्षही चांद्रयान-3 मोहीम बुधवारी यशस्वी झाली आहे. चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केली आहे. यामुळे चंद्रावर लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. याधी अमेरिका, रशिया आणि चीनने याआधी चंद्रावर यान पाठवले आहे. या चांद्रयान-3 मोहिमेचे काम इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वात टीम या मिशनसाठी काम करत आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 ची यशस्वी लँडिंग झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सतत सावली असते. या भागात सूर्य किरण पोहोतच नाहीत. या भागात मून-आईस आणि पाणी मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. या भागात पाणी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. या भागात 13 किलोमीटर पर्यंत के्रेटर म्हणजेच चंद्रावरचे खड्डे आहेत. चंद्रावर अनेक प्रकारचे धुमकेतू आदळून हे खड्डे तयार होता. या खड्ड्यांमुळे आकाशगंगेचा इतिहास शोधण्यास मदत होणार आहे. यापूर्वी इस्राने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवले होते. पण त्यांना यात अपयश आले होते. दक्षिण ध्रुवावर तापमान हे उणे 200 डिग्री सेल्सियअ असते. या भागात मनुष्याने पाठवलेले मशीन्स खराब होतात. नुकतेच रशियानेही चंद्रावर आपले यान पाठवले होते. पण ते अपयशी झाले. अशा वेळी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले होते. अशातच भारताने इतिहास रचून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
’अखंड भारतासाठी अभिमानाचा क्षण ः पंतप्रधान मोदी – चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगत त्यांनी हा क्षण भारतासाठी नवी चेतना देणारा ठरणारा असल्याचे सांगितले. जेव्हा आपण आपल्या डोळ्यांच्या समोर इतिहास घडताना पाहतो तेव्हा जीवन धन्य झाल्याचे दिसते. हा चिरंजीवी क्षण आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अद्भुत आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण अवघड महासागराला पार करण्याचा आहे. हा जिंकण्याच्या नव्या वाटेचा आहे. हा क्षण 140 कोटी लोकांच्या आशेचा आहे. नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. नव्या भारताचा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
COMMENTS