Homeताज्या बातम्यासंपादकीय

हिप्पोक्रॅटस् ते पोर्शे लॅब प्रकरण !

हिपोक्रॅटसच्या नावानं चांगभलं' नावाची कादंबरी गेल्या वर्षीच प्रकाशित झाली. या कादंबरीचे लेखक देखील पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे एक सेवानिवृत्त अ

आहारावर वाद करणाऱ्यांचे मनसुबे काय !
भुजबळांनी सावित्रीमाईंना राजकीय हत्यार बनवू नये!
ग्रामपंचायत जिंकण्याचा पक्षीय दावा चूकीचा ! 

हिपोक्रॅटसच्या नावानं चांगभलं’ नावाची कादंबरी गेल्या वर्षीच प्रकाशित झाली. या कादंबरीचे लेखक देखील पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे एक सेवानिवृत्त अधिष्ठाता आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील चालणारे गैर कृत्य उजागर करणारी, त्यांची ही कादंबरी मोठ्या प्रमाणात गाजली. या कादंबरीमध्ये पुणे आणि त्याच भागातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक पात्रं येतात. त्याच भागातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुरू असणाऱ्या गैर कृत्यांची एक जंत्रीच त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून पुढे आणली. या कादंबरीवर विशेष चर्चा झाली नसली तरी, पुण्यामध्ये सध्या पोर्शे कार चालवणाऱ्या श्रीमंत बापाच्या अवलादीच्या ज्या कहाण्या आता येत आहेत, त्यातून त्या कादंबरीतील विषय आता कसे वास्तवात आहेत, हे स्पष्ट होऊ लागले आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुनेच संबंधित हॉस्पिटल मधील लॅब प्रमुखांनी बदलून टाकल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या माहितीतून ही बाब देखील समोर आली आहे की, पोर्शे कारच्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांकडून संबंधित डॉक्टरांना फोन आला आणि त्यांनी काही जी ऑफर दिली असेल, त्यातून हे रक्ताचे नमुने बदलवण्याचं षडयंत्र झालं. रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण तपासले जाते. जर रक्तामध्ये अल्कोहोल असेल तर निश्चितपणे मद्यधुंद अवस्थेत ती गाडी चालवण्यात आली. मद्यधुंद असताना कोणतीही गाडी चालवण्यास, कोणालाही परवानगी नसते. अशा वेळी झालेला अपघात याला संबंधित व्यक्ती जबाबदार राहून त्याला शिक्षा होऊ शकते. या सगळ्या खटाटोपातून वाचवण्यासाठी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांनी जी कृत्ये केली ती, कोणत्याही अर्थाने क्षमायोग्य नाहीत.

यंत्रणा किती सडली आहे, याचा हा नमुना आहे. एखाद्या गोष्टीला वाचविण्यासाठी समग्र यंत्रणा कशी काम करते  सर्वसामान्यांच्या विरोधात अतिशय कडक कारवाई करणाऱ्या या यंत्रणा श्रीमंतांच्या अवलादींपुढे कशा झुकतात आणि या झुकण्यामागे त्यांचा काळा व्यवहार कसा असतो; हे देखील या निमित्ताने आता स्पष्ट झाले आहे. अर्थात, लॅबमधील डॉक्टरांचीच ही चूक आहे असं नाही, तर, यामागे एक साखळी असते. हिपोक्रॅट्स कादंबरीमध्ये नेमकं हेच मांडण्यात आलं आहे की, ही साखळी नेमकी कशी काम करते. त्यासाठी मध्यस्थ-दलाल हे प्रत्यक्षात अनेक घटकांना जोडण्यासाठी कसे प्रयत्न करतात, ह्या सगळ्या बाबींवर प्रकाश  पाडला आहे. परंतु, पोर्शे कारच्या अल्पवयीन मुलाच्या अनुषंगाने ज्या बाबी उघड झाल्यात, त्यामध्ये प्रत्यक्ष डॉक्टरांना त्या श्रीमंत अवलादीच्या बापानेच फोन केल्याचे आता उघड झाले आहे. अर्थात, यावर आता राजकीय दोषारोप सुद्धा होत आहेत. अनेक पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अर्थात, अशा प्रकारच्या जेव्हा घटना घडतात, तेव्हा, केवळ एकाच पक्षाचे राजकीय नेते त्यामध्ये सामील असतात, असे नव्तर . तर, त्यांची  एक साखळी असते. कारण, अशा प्रकारच्या श्रीमंतीचा माज असलेल्या कडूनच राजकीय पक्षांना फंडिंग दिला जातो. त्यामुळे या प्रकरणांमध्ये एका बाजूला जनतेला मूर्ख बनवत त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध आणि त्याच्या कुटुंबावर कडक कारवाई करण्यात येत असल्याचे भासवायचे आणि दुसऱ्या बाजूला सर्व आरोपांमधून त्याला कसं मुक्त करता येईल, याची सगळी घडी बसवायची! मात्र, या प्रकरणांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण गरम असतानाच हे सगळं घडत असल्यामुळे विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांचेही यावर लक्ष आहे. त्यामुळे, काही बाबी पुढे येत आहेत. परंतु, एकंदरीत यंत्रणा किती सडली आहे, याचे हे गमक आहे. पुण्याचे अटक झालेले दोन्ही डॉक्टर हे अशा प्रकारची प्रॅक्टिस यापूर्वीही करत असतील; असेही समजण्यास वाव आहे! कदाचित, या प्रकरणात त्यांच्यावर राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात असेल, त्यामुळे ते यासाठी तयार झाले असतील किंवा त्यांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवलं गेलं असेल, त्यासाठी देखील ते तयार झाले असतील; परंतु, काही झाले असले तरी या उच्च शिक्षित डॉक्टरांनी आपली किमान नैतिकता पाळणे गरजेचे आहे. लोकशाही व्यवस्था ही अशा विश्वासावरच उभी आहे. त्याच विश्वासाला तोडून यंत्रणेतले घटक विश्वासघात करत असतील तर, ते कोणत्याही परिस्थितीत क्षमायोग्य नाही.

COMMENTS