हिंगोली : लातूर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर सोमवारी हिंगोली शहरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे ख
हिंगोली : लातूर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर सोमवारी हिंगोली शहरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे खळबळ उडाली आहे. पहाटे 5 वाजून 9 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले.
ग्रामस्थ साखर झोपेत असतांना अचानक जमीन हादरू लागली. यामुळे काही नागरिकांना जाग आल्याने ते घाबरून बाहेर आले. तब्बल 3.5 रिश्टर स्केल एवढी तीव्रता भूकंप मापकावर नोंदवल्या गेली. या भूकंपामुळे हिंगलो जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात पहाटे नागरीक साखर झोपेत असतांना अचानक जमिन हादरू लागली. काही काळ हे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीच्या वसमत कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील दहा ते बारा गावांत हे भूकंपाचे धक्के बसले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरीक घरातून बाहेर पळून आले. सुदैवाने कुठेही आर्थिक नुकसान वा जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
COMMENTS