बीड प्रतिनिधीं - सध्या राजकीय पक्षात कितीही अस्थिरता असली तरी बीडमध्ये मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण काम करू इच

बीड प्रतिनिधीं – सध्या राजकीय पक्षात कितीही अस्थिरता असली तरी बीडमध्ये मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण काम करू इच्छित आहेत. हिंगणी येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड यांनी नुकताच प्रवेश केला आहे.
बीड मतदार संघात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण प्रवेश करू लागले आहेत. सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व म्हणून आण्णाकडे पाहिले जाते. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या सारख्या युवा नेतृत्वाने तरुणांची नवी फळी मतदार संघात उभी केली आहे. सत्ता असो वा नसो माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा शासन दरबारी असणारा पाठपुरावा आणि कार्यकर्त्यांची कामे झाकून राहत नाहीत. ग्रामीण भागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यावर अधिक भर असतो त्यामुळे अनेकजण पुन्हा माजी मंत्री क्षीरसागर गटात सामील होत आहेत. हिंगणी येथील सरपंच संतोष तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड यांनी क्षीरसागर गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी परशुराम तांदळे,अंकुश तांदळे,पांडुरंग तांदळे,किरण तांदळे,आदी उपस्थित होते.
COMMENTS