फलटण तालुक्यातील तर्हा; ग्रामस्थांमध्ये नाराजीफलटण / प्रतिनिधी : फलटण पूर्व भागातील पवारवाडी सारख्या तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला स्वतः
फलटण तालुक्यातील तर्हा; ग्रामस्थांमध्ये नाराजी
फलटण / प्रतिनिधी : फलटण पूर्व भागातील पवारवाडी सारख्या तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला स्वतःची स्मशानभूमी नसल्याने दुसर्या गावात जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. प्रशासनाकडून स्मशानभूमीबाबत कोणत्याही प्रकारची आजअखेर व्यवस्था करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
फलटण तालुक्यातील पवारवाडी गावाची लोकसंख्या तीन ते चार हजारांच्या आसपास आहे. या गावातील ग्रामपंचायतीत अनेकजणांच्या सत्ता आल्या अनेक जणांच्या गेल्या. तसेच काही नेत्यांनी सलग 10 ते 15 वर्षे सत्ता भोगली. परंतू स्वातंत्र्याची 75 वर्षे होवूनही नागरिक मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. या गावात अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नाही. गावाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न असून लोकांना अंत्यविधीसाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या ढवळेवाडी गावात जाऊन अंत्यसंकार करावे लागत आहेत. मुस्लिम समाजातील लोकांना कब्रस्थानसाठी चार-पाच किलोमीटरवर असलेल्या आसू गावात आणावे लागत आहे.
पवारवाडी गावाला स्मशानभूमी नसल्याने येथील जनता त्रस्त असून झालेल्या गोष्टीस प्रशासन जबाबदार आहे, अशी गावातील लोकांची तक्रार आहे. प्रशासनाने हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. मृत्यूनंतर होणारी विटंबना थांबवावी, अशी जनभावना गावातील लोकांची आहे. त्यामुळे स्मशानभूमी नाही गावाला; गाव नुसते नावाला अशी भावना येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
पवारवाडी गावातील राजकीय पक्षांकडून गावकर्यांना फक्त आश्वासनेच मिळाली असून हक्काची स्मशानभूमी अजूनही मिळाली नाही. पवारवाडी शेजारी ढवळेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमीत ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन स्मशानभूमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
COMMENTS