कश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमुळे पुन्हा हिंदूंचे पलायन

Homeताज्या बातम्यादेश

कश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमुळे पुन्हा हिंदूंचे पलायन

श्रीनगर/वृत्तसंस्था : कश्मीर खोर्‍यात 1990 ला दहशतवादी कारवाया टिपेला पोहोचल्या असतानाही ज्या हिंदूंनी आपले गाव सोडले नाही, त्यांच्यावर आता निर्वासित

ठाकरेसेना नसून शिल्लकसेना
कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
मुंबईला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

श्रीनगर/वृत्तसंस्था : कश्मीर खोर्‍यात 1990 ला दहशतवादी कारवाया टिपेला पोहोचल्या असतानाही ज्या हिंदूंनी आपले गाव सोडले नाही, त्यांच्यावर आता निर्वासित होण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांकडून सतत होणार्‍या टार्गेट किलिंगमुळे शोपियान जिल्हयातील चौधरीगुंड गावातील राहिलेल्या शेवटच्या कश्मिरी पंडित महिला डॉली कुमारी यांना आपले घरदार, गाव सोडावे लागले. दहशतवाद्यांकडून कश्मिरी पंडित आणि बिगरकश्मिरी नागरिकांची निवडून हत्या केली जात आहे.
शोपियान जिल्हयात जूनपासून दहशतवाद्यांनी सात कश्मिरी पंडितांची हत्या केली. 15 ऑक्टोबरला चौधरीगुंड गावात दहशतवाद्यांनी पुरण कृष्ण भट यांची गोळ्या घालून हत्या केली. तत्पूर्वी शोपियान जिल्हयातच छोटीराम गावात सफरचंदाच्या बागेत एका पंडिताची हत्या झाली होती. 1990 च्या दशकात कश्मीर खोऱयात दहशतवादी कारवाया टिपेला पोहोचल्या होत्या. त्या काळातही शोपियान जिल्हयासह काही ठिकाणी हिंदूंनी आपले गाव, घर, शेती सोडली नाही. मात्र, आज 1990 पेक्षाही भयंकर दहशत आहे. टार्गेट किलिंगमुळे शोपियान जिल्हयात चौधरीगुंड या एका गावातून 10 कश्मिरी पंडित कुटुंबांनी आपले घर-दार, गाव सोडले. मात्र, डॉली कुमारी ही पंडित महिला मात्र गावातच राहिली. तिचे शेवटचे एकमेव पंडित कुटुंब तिथे राहत होते. अखेर डॉली कुमारीनेही कुटुंबासह गाव सोडले आहे. जम्मू-कश्मीरात राष्ट्रपती राजवट आहे. तेथील कायदा-सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी पेंद्र सरकारची आहे. मात्र, दहशतवाद्यांकडून होणाऱया टार्गेट किलिंगमुळे कश्मिरी पंडित भयभीत आहेत. यापूर्वी अनेकदा पंडितांनी मोदी सरकारविरुद्ध आंदोलन करून संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी कारवाया कमी झाल्या नाहीत, उलट टार्गेट किलिंग प्रचंड वाढले आहे. पेंद्रातील मोदी सरकारचे धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

COMMENTS