Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदू-मुस्लिम बांधवानी रक्तदान करत दिला एकतेचा संदेश

कोपरगाव शहर : उन्हाळ्याच्या दिवसात रक्ताचा तुटवडा जाणवू नये तसेच आपण देखील समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील करंजी ये

आशा सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपये वाढ l DAINIK LOKMNTHAN
अडत्याला वीस लाखाचा चुना ; व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल l LokNews24
पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा; अपघात टाळा!

कोपरगाव शहर : उन्हाळ्याच्या दिवसात रक्ताचा तुटवडा जाणवू नये तसेच आपण देखील समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील जामा मस्जिद ट्रस्ट मध्ये करंजी गावच्या हिंदू मुस्लिम बांधवांनी रमजान ईदच्या दिवशी एकत्र येत रक्तदान शिबिराचे आयोजन करत हिंदू मुस्लिम एकोप्याचा संदेश दिला. जामा मस्जिद ट्रस्ट करंजी हिंदू मुस्लिम ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते आशरफ बाबुलाल इनामदार यांच्या संकल्पनेतून रमजान ईदच्या दिवशी साई हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित संजीवनी ब्लड सेंटर कोपरगाव यांच्या वतीने करंजी गावात राबवण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 23 हिंदू मुस्लिम रक्तदात्यांनी रक्तदान करत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजाला दिला. याप्रसंगी सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, माजी संचालक संजय आगवण, आप्पासाहेब आगवन,नवनाथ आगवन, अनिल चरमळ, लक्ष्मण शेळके, अनिल डोखे, बंडू आगवन, अजय भिंगारे, आप्पासाहेब भिंगारे, भास्कर येवले, आकाश डोखे, रोहित डोखे, संजय शिंदे, गोकुळ जाधव, रामदास चरमळ मौलाना मोसीन सहाब, बनेमिया शेख, सांडू शेख, बाबूलाल शेख, हारून शेख, आशपक मणियार, भैय्या शेख, जाकीर शेख, अल्ताफ इनामदार,आशपक इनामदार,राजू शेख, मुनिर शेख,मोहमद शेख, अकील शेख, युनूस शेख,सलीम शेख,अल्ताफ शेख,लाला शेख,सिकंदर शेख,रज्जाक शेख,फिरोज शेख,अल्लाबकस शेख,मुनिर शेख,हुसेन शेख,जमिल शेख,तोफिक शेख,मुस्ताक शेख,मनेखा पठाण, मदेखा पठाण,रज्जाक पठाण, मुनिर पठाण,चांद पठाण,रहीम पठाण,निसार पटेल,इकबाल पटेल, रशीद पटेल, नदीम पटेल, असिफ पटेल आदी हिंदू मुस्लिम बांधवांसह संजीवनी ब्लड सेंटरच्या प्रमुख नीता पाटील , डॉ आढाव मॅडम, डॉ कविता चौधरी, विराज गायकवाड, रेणुका औटी, ऋतुजा लोंढे, सनी धिवर, योगेश त्रिभुवन आदींनी शिबीर यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.तर या प्रसंगी सर्व रक्तदात्याना संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.

COMMENTS