पुणतांबा/प्रतिनिधी ः श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा राहता तालुक्यातील नावाजलेला साखर कारखाना आगामी काळात निवडणुकीला सामोरा जाणार असून सर्वाधिक

पुणतांबा/प्रतिनिधी ः श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा राहता तालुक्यातील नावाजलेला साखर कारखाना आगामी काळात निवडणुकीला सामोरा जाणार असून सर्वाधिक काळ या कारखान्याचा कारभार माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या विचारांच्या संचालक मंडळाने पाहिला आहे. प्रतिकूल काळातही शेतकरी सभासद,कारखाना व कर्मचारी यांचे हित जोपासत कोल्हे पॅटर्नमुळे ऊस उत्पादक आणि कारखाना यांच्यात समन्वय राहिला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत आपण व्यक्तिशः लक्ष घालावे यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांचे वाहन अडवत गणेश सभासदांनी साकडे घातले आहे.
सहकारातील मुरब्बी नेते आणि सहकार वाढीसाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे धोरण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे होते.गणेश कारखाना कोल्हे यांनी खमकी भूमिका घेत चालवला.एकीकडे सहकारी क्षेत्राला खाजगी कारखान्यांचे आव्हान निर्माण होत असतांना सामान्य शेतकरी व कष्टकरी वर्गातील सभासदांना कोल्हे यांच्यावर असणारा अतूट विश्वास हा दूरदर्शी नेतृत्वाची किमया आहे.गणेश कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणे हे कोल्हे कुटूंबाचे वैशिष्ट्य राहिले आहे.श्री गणेश कारखाना आणि माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचा अतुट संबंध असल्यांने ही कामधेनु वाचविण्यासाठी संचालक मंडळ निवडणुकीत विवेकभैय्या कोल्हे यांनी लक्ष घालण्यासाठी सभासद एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. श्रीगणेश सहकारी साखर कारखाना चालू करून या परिसराचे भाग्य उजळण्याचे काम माजीमंत्री शंकरराव कोल्हे पॅटर्नने केले. राज्यात बंद पडलेली सहकारी साखर कारखानदारी कशी चालवावी याचे मूर्तीमंत उदाहरण माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी घातले होते. या परिसरातील शेतकरी सभासद कामगार व साखर कारखानदारीवर अवलंबुन असणारा घटक अजुनही कोल्हे कुटुंबियांशी प्रामाणिक आहे. सहकारात शंकरराव कोल्हे यांच्यानंतर बिपीनदादा कोल्हे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून व उस लागवड व त्यावर अवलंबुन असणारे अर्थकारण चांगल्या प्रकारे सांभाळले आहे.उसाला शाश्वत दरासह अतिरिक्त वाढीव दर मिळावा, सहवीज निर्माती, डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प व त्याचे वैभव या परिसरात दिसावे यासाठी सभासद आग्रही आहेत. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या अफाट ज्ञान आणि कार्यशैलीची छाप नागरिकांना विवेकभैय्या कोल्हे यांच्यात वाटत असल्याने आग्रही आक्रमकता दाखवून या शेतकरी व सभासदांनी पुनश्च एकदा विकासाचा कोल्हे पॅटर्न राबवण्याच्या दृष्टीने चर्चा केली आहे.एकूण 63 वर्षात 38 वर्षांहून अधिक कालखंड माजी मंत्री कोल्हे यांचा करीष्मा गणेशच्या निवडणूकित राहिला आहे तीच भावना व्यक्त करत सभासदांनी विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्रसंगी गणेेश कारखान्याचे संचालक व शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, सुधाकर जाधव, सोपान धनवटे, संभाजी गमे, किसन बोरबने, गणेश बनकर, जेजुरकर, संजय जाधव, साहेबराव बनकर, चंद्रकांत वाटेकर, सर्जेराव जाधव आदिंसह शेतकरी सभासद उपस्थित होते.
COMMENTS