Homeताज्या बातम्यादेश

चीन-पाक सीमेवर हायटेक ड्रोन तैनात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः चीन आणि पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे भारताकडून सीमेवर हायटेक प्रण

शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून इतर कामे देणे चुकीचे
परवानगी फांद्या तोडण्याची, मात्र तोडली संपूर्ण झाडे
धावत्या रेल्वेपासून इंजिन झाले वेगळे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः चीन आणि पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे भारताकडून सीमेवर हायटेक प्रणाली वापरण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय लष्करही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे शेजारील देश चीन आणि पाकिस्तान यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या उत्तर आणि पश्‍चिम सीमेवर स्वदेशी ड्रोन तैनात केले आहेत. दुसरीकडे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पूर्व लडाखच्या रणनीतिक न्योमा पट्ट्यात 218 कोटी रुपये खर्चून एक हवाई क्षेत्र बांधणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 12 सप्टेंबर रोजी त्याची पायाभरणी करणार आहेत.
नॉर्दन कमांडचे चीफ ऑफ स्टाफ, लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता म्हणाले की, शत्रूचा मुकाबला करण्यासाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी आमच्या उत्तर आणि पश्‍चिम सीमेवर हायटेक ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. हे देशातच बनवले गेले आहेत. लॉजिस्टिक ड्रोन आणि स्वायत्त वाहनांवर बरेच संशोधन झाले आहे. सेनगुप्ता म्हणाले आम्ही लॉजिस्टिक ड्रोन देखील वापरत आहोत. त्यामुळे सीमेवर कारवायांकडे त्वरित लक्ष वेधता येणार आहे.

COMMENTS