मुंबई ः मुंबई पोलिसांची अनोखी ख्याती आहे. आरोपीला शोधण्यासाठी त्यांना, बेडया घालण्यासाठी मुंबई पोलिसांची गणती स्कॉटलंडच्या पोलिसांशी केली जाते. म
मुंबई ः मुंबई पोलिसांची अनोखी ख्याती आहे. आरोपीला शोधण्यासाठी त्यांना, बेडया घालण्यासाठी मुंबई पोलिसांची गणती स्कॉटलंडच्या पोलिसांशी केली जाते. मात्र आता मुंबई पोलिसांचा हजरजबाबीपणा देखील समोर आला आहे. एका मुलीने मुंबई पोलिसांना एक ट्वीट टॅग करीत अनोखी तक्रार केली आहे; जी आता व्हायरल होत आहे. त्यावर मुंबई पोलिसांनी एकदम बॉलीवूड स्टाईलने उत्तर दिले आहे. वेदिका आर्या नावाच्या एका मुलीने सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे. हे ट्वीट तिने मुंबई पोलिसांना टॅग करीत लिहिले की, मी पोलिस ठाण्यावर जात आहे. मी माझी शांतता हरवून बसली आहे.
या ट्वीटला मुंबई पोलिसांनी बॉलीवूड स्टाईलने एक मजेशीर उत्तर दिलं आहे. उत्तरादाखल पोलिसांनी लिहिले की, मिस आर्या, आपल्यापैकी बरेच जण सुकूनच्या शोधात आहेत. तुमच्या आमच्यावरील विश्वासाची आम्ही प्रशंसा करतो आणि आम्हाला खात्री आहे की, तुम्हाला तो तुमच्या आत्म्यात सापडेल. दिसणार्या इतर कोणत्याही गोष्टींसाठी तुम्ही ‘अर्थात’ आमच्याकडे येऊ शकता. मुंबई पोलिसांचे हे मजेशीर ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांमधील ट्वीटला लोकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दोघांमधील या ट्वीटचा आनंद घेत एका युजरने लिहिले की, मित्रांसोबत तुम्हाला नेहमी शांतता मिळेल. आणखी एका युजरने लिहिले की, मला आश्चर्य वाटते; पण एखाद्या मुलाने असे ट्वीट केले असते, तर मुंबई पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली असती? तर दुसर्या युजरने लिहिले की, शायरना रिप्लाय! सर, तुम्ही शब्दांनी मन मोडलेल्या प्रेमीसारखे दिसता. ही पोस्ट एक लाखाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि त्यावर खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना ही पोस्ट मनोरंजक वाटली; तर काहींनी इतर महत्त्वाच्या पदांवर विभागाने कसे लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर टिप्पणी केली आहे.
COMMENTS