Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती

अपघात रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

यवतमाळ प्रतिनिधी - जिल्ह्यात २०२२ या वर्षात ६६२ वाहनांचे अपघात घडले असून, मृत्यूमुख ४२६ तर ५८६ गंभीररित्या जखमी झाले. जखमीपैकी अनेकांना कायम

 डोंबिवलीत प्रियकरांनी केली प्रेयसीची हत्या
पुण्यातील सात मंडळांचे बाप्पा एकाच रथात विराजमान होणार
अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

यवतमाळ प्रतिनिधी – जिल्ह्यात २०२२ या वर्षात ६६२ वाहनांचे अपघात घडले असून, मृत्यूमुख ४२६ तर ५८६ गंभीररित्या जखमी झाले. जखमीपैकी अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात झाल्यानंतर तसेच त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटुंबावर प्रचंड आर्थिक व मानसिक आघात होतो, त्यांची हानी होते. ती कधीच भरुन निघणारी नसते. वाहन अपघातात मृत्यू होणाºयांची संख्या लक्षात घेता, ७० टक्के अपघातामध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू डोक्यावर हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे दिसून येते. विशेष करुन दुचाकीस्वारास अथवा त्याचे मागील सिटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यास मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. अपघातांच्या संख्येत तसेच त्यामध्ये मृत्यू व जखमी व्यक्तींच्या संख्येत मासिक ३० टक्के कमी करण्याचे दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाकडून मोटार वाहन नियमांचे पालन न करणाºया वाहन चालकांविरुद्घ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. १ मार्चपासून जिल्ह्यातील शहर व १६ तालुक्यातील मुख्य व इतर रस्त्यांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. 

COMMENTS