Homeताज्या बातम्यादेश

महुआ मोईत्रा यांच्या खासदारकीवर टाच

नैतिकता पालन समितीकडून निलंबनाचा प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली ः तृणमूल काँगे्रसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कारण पैसे घेऊन प्रश्‍न विचारल्याप्रकरणी संसदेच्या नैति

मुस्लिम आरक्षण मिळावे ः मंत्री सत्तार
आत्मटीका, आत्मचिंतनातून काॅंग्रेसला पूर्व वैभव !
वैद्यकीय प्रवेशासाठी 10 लाखाची लाच घेणारा डीन ताब्यात

नवी दिल्ली ः तृणमूल काँगे्रसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कारण पैसे घेऊन प्रश्‍न विचारल्याप्रकरणी संसदेच्या नैतिकता समितीने त्यांच्या विरोधात प्रस्ताव पास केला आहे. या प्रस्तावाच्या बाजूने सहा सदस्यांनी मतदान केले आहे. तर 4 सदस्यांनी विरोधात मतदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या लोकसभेतील खासदारकी धोक्यात आली आहे.
भाजप खासदार विनोदकुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शुक्रवारीर महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये समितीचा 500 पानी अहवाल स्वीकारण्यात आला. समितीच्या सहा सदस्यांनी अहवाल स्वीकारण्यास पाठिंबा दिला तर चार जणांनी विरोध केला, असे सोनकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. अहवालानुसार, महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून हकालपट्टी करण्याच्या बाजूने 6 खासदारांनी मतदान केले, तर विरोधात 4 खासदारांनी मतदान केले. या 15 सदस्यीय आचार समितीमध्ये भाजपचे सात, काँग्रेसचे तीन आणि बसपा, शिवसेना, वायएसआर काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) आणि जनता दल (युनायटेड) यांच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. महुआच्या हकालपट्टीच्या समर्थनार्थ मतदान करणार्‍यांमध्ये काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांचाही समावेश आहे. प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली पक्षातून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, पॅनेलचे सदस्य आणि जेडीयूचे खासदार गिरीधारी यादव म्हणाले की, सदस्यांमध्ये अहवालावर कोणतीही चर्चा झाली नाही. ते पुढे म्हणाले, हे नियमांचे घोर उल्लंघन आहे. तुम्ही फक्त उलटतपासणी घेतली आहे. त्यानंतर तुम्ही पॅनेलच्या सदस्यासोबत चर्चा करायला हवी होती. त्यांच्याकडे बहुमत आहे आणि त्यामुळे ते काहीही करू शकतात. विरोधकांकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, असे विचारले असता, खासदार महुआ मोईत्रा यांना पाठिंबा देत म्हणाले, महाभारत (युद्ध) द्रौपदीच्या अपहरणामुळे झाले.

COMMENTS