Homeताज्या बातम्यादेश

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं तांडव

मुसळधारात पावसात इमारत कोसळली

हिमाचल प्रदेश प्रतिनिधी - हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे परिस्थिती खूपच भयंकर झाली आहे. कुठे पूरस्थिती तर कुठे भूस्खलन होण्याच्या घटना घडत

अमित ठाकरे यांनी घेतला सोलापुरी हुरड्याचा आस्वाद
श्री साईगाव पालखीचे पूजन करून आ. काळेंनी दिल्या शुभेच्छा
कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना अडवू नका; अन्यथा गुन्हे दाखल करू

हिमाचल प्रदेश प्रतिनिधी – हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे परिस्थिती खूपच भयंकर झाली आहे. कुठे पूरस्थिती तर कुठे भूस्खलन होण्याच्या घटना घडत आहेत. महिन्याभरात तिसऱ्यांदा अशी स्थिती निर्णाण झाली आहे. भूस्खलन झाल्याने पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्याचा एक लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन अंगावर अक्षरश: काटा येतो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आणि चार मजली इमारतीसह शेजारील इतरही इमारती कोसळल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. असे म्हटले जात आहे की, प्रशासनाने या इमारती आधीच रिकाम्या केल्या होत्या आणि त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

राज्यात गेल्या 36 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. दोन ठिकाणी ढगफुटी, तर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान कुल्लू येथून एक भयानक दृश्य समोर आले आहे. जिथे काही वेळातच अनेक घरे कोसळली. तीन घरे पत्त्यासारखी कोसळली कुल्लूमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शिमल्याच्या कृष्णा नगरमध्ये घर कोसळल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. कुल्लूच्या अनी उपविभागाच्या बसस्थानकाजवळ गुरुवारी सकाळी चारहून अधिक घरे पत्त्यासारखी कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे

COMMENTS