Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात वळीवाच्या पावसाचा तडाखा

कुडाळ : जावळी तालुक्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस. कराड शहरात वीजचे खांब मोडून तारा तुटल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्

महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
संप संपल्यानंतर आज पासून होणार नुकसानीचे पंचनामे; ४० ते ४५  हेक्टर वरील पिकांचे नुकसान
सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 60 एकर ऊस जळून खाक

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्याच्या विविध तालुक्यात शुक्रवारी दुपारी चार वाजल्यानंतर सोसाट्याच्या वार्‍यांसह विजांच्या कडकडाटात गारांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा असल्याने जुनी झाडे तसेच विजेच्या तारा तुटल्याने परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. सातारा शहरात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आखाड्याभोवती प्रकाश योजनेची यंत्रणा कोसळल्याने कुस्तीगिरांच्या आनंदात विरजन पडले. जावली तालुक्यात विविध ठिकाणी पडलेल्या गारांच्या पावसामुळे परिसरात सर्वत्र बर्फच-बर्फ दिसून येत होते. तसेच कराड तालुक्यातही पावसाने जोरदार तडाखा दिला. शहरातील कृष्णा नदीवरील पुलावर पाणी साचल्याने दुचाकी स्वारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तर विजेच्या तारा तुटल्याने शहरातील विज पुरवठा खंडीत झाला.

जावळी तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी
कुडाळ / प्रतिनिधी : जावळी तालुक्यातील कुडाळ व मेढा परिसरात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारासमेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेली काही दिवसांपासून उष्मा अधिकच वाढला होता. वाढत्या उकाड्याने नागरिकही हैराण झाले होते. अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडाली.
आज दुपारपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाने उष्म्यापासून काहीशी मुक्तता मिळाली. मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता जाणवू लागली होती. तापमानाचा मारा 38 अंशापेक्षा अधिक झाला होता. यामुळे शेतीकामांच्या वेळा बदलल्या होत्या. सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने सहाच्या सुमारास पावसाने चांगलाच जोर धरला. अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच धांदल उडाली. मेघ गर्जनेसह पाऊस सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. यादरम्यान काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. पावसाच्या जोरदार आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सर्वत्र अतिशय संथपणे पडणार्‍या पावसाने परिसर न्हाऊन निघाला.

वादळी पावसाने कराड शहरात मोठे नुकसान
कराड / प्रतिनिधी : वादळी पावसाचा कराड शहरासह तालुक्याला आज जोरदार तडाखा बसला. शहरातील पंचायत समिती व प्रशासकीय इमारतीचा परिसर, दत्त चौक, स्टेशन रोडवरील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील परिसरात झाडे, वीजेचे खांब उन्मळुन पडले. झाडे व फांद्या वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाल आहे. अनेक ठिकाणी वीजचे खांब मोडून तारा तुटल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. त्याचबरोबर शहरातील अनेक दुकानांचे पत्रे, फ्लेक्स बोर्ड, बॅनर उडून गेले.
कराड शहरासह तालुक्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. आज हवेतील उष्मा जास्तच वाढला होता. दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह पावसास सुरुवात झाली. वादळी वार्‍याचा जोर मोठा असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. त्याचबरोबर झाडे व फांद्या वाहनांवर पडून नुकसान झाले. अनेक ठिकाणी पावसाने शहरात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने अनेक दुकानांचे पत्रे उडाले. झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. कराड शहरातील मंगळवार पेठेत पत्रे उडून गेले आहेत. त्याचबरोबर कृष्णा पुलावर पाणी साचून राहिल्याने काहीकाळ वाहतुक विस्कळीत झाली होती.

COMMENTS