Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पावसाची जोरदार हजेरी

पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी यलो अलर्ट

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाला सुरुवात झाली असून, शनिवारी पावसाने राज्यातील विविध जिल्ह्यात हजेरी ला

ओबीसी आरक्षणाचा पेच कायम
दारु तस्करीसाठी समृद्धी महामार्गाचा वापर
सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाला सुरुवात झाली असून, शनिवारी पावसाने राज्यातील विविध जिल्ह्यात हजेरी लावली आहे. अहमदनगरसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात धुंवाधार पाऊस झाला. काही दिवस वातावरणात उकाडा जाणवत होता त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
पुढील 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा. पुढील तीन ते चार तासात रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील पुढील चार तासात जोरदार पावसाचा इशारा वर्तवला आहे. त्यासोबतच रत्नागिरीतील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.  पुढच्या 2 दिवसात मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी स्थिती अनुकुल आहे. आज अलिबागपर्यंत मान्सून आला आहे. राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात राज्यात धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही भागाला यलो अलर्ट दिला आहे. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे – राज्यात शनिवारी अनेक ठिकाणी मान्सूनने हजेरी लावली आहे. पुढचे 5 दिवस राज्यात मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता आहे. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसू शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.कोकण आणि विदर्भासह पुणे, सातारा आणि नाशकातही मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरत आहे. मराठवाड्यामध्ये देखील कालपासून पावसाचा जोर कायम आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पुणे, सातारा, नाशिक या सर्वच शहरांमध्ये पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.हवामान खात्याने  दिलेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये आज मुसळधार पाऊस बरत आहे. तसेच रात्रीपर्यंत यलो अलर्ट जारी केला. पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी 26 ते 28 जून या दिवसांत देखील अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. तीन दिवस या शहरांना यलो अलर्ट देण्यात आला.

COMMENTS