Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी

सखल भागात साचले पाणी, वाहतूक विस्कळीत

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, अखेर पावसाला सुरूवात झाली असून, शुक्रवारी मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल

भुसावळात केमिकल फॅक्टरी भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान | LOKNews24
उन्हाचा पारा वाढु लागल्याने गुजरातच्या मातीचे माठ विक्रीसाठी दाखल  
ऑपरेशन लोटसची चौकशी होणार ; येदियुरप्पा यांच्यासमोरील अडचणीत वाढ

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, अखेर पावसाला सुरूवात झाली असून, शुक्रवारी मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मुंबईसह अंधेरी जोगेश्‍वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील सखल भागांत देखील पाणी साचण्यास सुरूवात झाली.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पश्‍चिम बंगालच्या सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा विदर्भ या भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई उपनगरात मागील पाऊण तासापासून जोरदार कोसळणार्‍या पावसामुळे उपनगरातील अनेक सखल भाग हे पाण्याखाली गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणारा अंधेरी सबवे जलमय झाला आहे. अंधेरी सबवेत तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे आज सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि मुंबई वाहतूक पोलीस या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः उभे राहून नागरिक आणि वाहन चालकांना सबवेतून जाण्यास मनाई करत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळत आहे. काल देखील मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तासभर बंद करण्यात आला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर दुसर्‍यांदा ओव्हर फ्लो झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने आज सकाळ मुंबईत पाणी पुरवठा करणारे मध्य वैतरणा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडकसागर हे दुसरे धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. या धरणाचे दोन स्वयम चलित दरवाजे उघडण्यात आले असून या मधून 13867 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाडा, पालघर, वसई, तालुक्यातील नदी काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS