Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई/प्रतिनिधी ः उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, महाराष्ट्रात अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही, त्यामुळे शंभर टक्के पेरण्या झालेल्या

राज्यात पुन्हा राजकीय स्फोट होणार
शिक्षकांच्या गाडीला मुंढेगावजवळ अपघात, ३ ठार तर ४ गंभीर | LOKNews24
देवाचीच केली लबाड भक्ताने फसवणूक

मुंबई/प्रतिनिधी ः उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, महाराष्ट्रात अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही, त्यामुळे शंभर टक्के पेरण्या झालेल्या नाहीत. अनेक जिल्ह्यात पेरण्या 20 ते 30 टक्क्यांच्या पुढे गेलेल्या नाहीत. मात्र राज्यात आगामी काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
येत्या 24 तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल, असं हवामान खात्याने सांगितले आहे. मागील एक-दोन दिवसांपासून कोकण आणि गोवा विभागात उकाडा जाणवत आहे. पण तापमानातील ही वाढ मर्यादीत असेल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जुलै महिन्यात राज्यात सरासरीइतका पाऊस पडेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची पावसाची सरासरी भरून काढेल, अशीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या उत्तर भारतात पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखडं, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये अनेक पर्यटक अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आम्ही मनालीचा मार्ग खुला केला असून सुमारे 1000 वाहने निघाली आहेत. अडकलेल्या सर्वच पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली.

या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार – नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

COMMENTS