Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगामी पाच दिवस मुसळधार पावसाचे

प्रथमच पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात जुलै महिन्यांचा मध्यावधी उलटला असला तरी, अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत, मात्र उर्वरित दिवसांमध्ये राज्यामध्ये चांगला पाऊ

मोबाईल मधील गेममुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू | LOKNews24
पुण्यात साडेचार लाखाचे कोकेन जप्त
ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने गॅस टँकर पलटी | LOK News 24

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात जुलै महिन्यांचा मध्यावधी उलटला असला तरी, अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत, मात्र उर्वरित दिवसांमध्ये राज्यामध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तवला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मुंबईत बुधवारी, तर ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये बुधवार आणि गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना प्रथमच रेड अलर्ट दिले आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिले आहे. यामुळे राज्यातील काही भागांना अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी 18 रोजी रेड अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत 19 रोजी रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पाच दिवस राज्यात चांगलाच पाऊस होणार आहे. पुढील 2 दिवसांमध्ये भारताच्या काही भागांत जोरदार पाऊस होणार आहे. कोकणचा काही भाग, सातारा, पुणे नाशिकचा घाट क्षेत्र आणि किनारी आंध्रचा काही भागात आणि मराठवाड्यातील काही भागांत तुरळक अन् मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात पाऊस सुरु आहे. ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. विदर्भात पाऊस सुरु असल्यामुळे धरणसाठा चांगला वाढणार आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गडचिरोली नगरपरिषदच पाण्याखाली आली आहे. जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे सखल भाग जलमय झाला आहे. राज्यात पावसाने जोर पकडला आहे. यामुळे आता धरणसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. पावसाळा सुरु होऊन दीड महिना झाल्यानंतर राज्यातील धरणांमध्ये 30 टक्के जलसाठा होता. यामुळे शहरांमध्ये पाणी कपात करण्यासंदर्भात चर्चा होऊ लागली होती.

कोणत्या भागांत मुसळधार पाऊस?- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पालघर, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर इतर महाराष्ट्रामध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसतील अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

COMMENTS