Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद

मुंबई : उत्तर भारतातील पावसानंतर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केली असून, शुक्रवारी मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाम

मिशन रानीगंज – द ग्रेट भारत रेस्क्यू’ चा थरारक ट्रेलर रिलीज
या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे – अतुल लोंढे
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांची वाळूज औद्योगिक नगरीत भेट

मुंबई : उत्तर भारतातील पावसानंतर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केली असून, शुक्रवारी मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतूक संथ गतीने पुढे जात असून काही ठिकाणी ट्राफिक जॅम देखील झाले आहे. पावसाचे पाणी सखल भागात साचायला लागले आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे,वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.
राज्यात पावसाने काही भागात तूफान हजेरी लावली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावासाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत देखील गेल्या काही दिवसांपासूंन संततधार सुरू आहे. आज सकाळ पासून मुंबई, ठाणे आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. परिणामी वाहतूक देखील मंदावली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरीत सबवे मध्ये पाणी भरले आहे. या सोबतच दादर, सायनमध्ये सखल भागात पाणी साठले आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई ट्रॅफिक विभागाने ट्विट करून दिली आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. रात्री उशिरापासून मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक मंदावली आहे. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. सकाळपासून ठाण्यासह अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागांतही मुसळधार पाऊस होत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस तळ कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यवतमाळमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान – यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील मागील 30 वर्षातील सर्वाधिक पाऊस कोसळला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.नेर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता. इकडे शेतकर्‍यांनी जमिनीत स्वप्न पेरले होते. मात्र तो साखर झोपेत असतानाच त्याचे हे स्वप्न या पावसाने पुरते वाहून नेले.

COMMENTS