Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असल्यासारखी अक्षरश: उष्णता जाणवत आहे. गेल्या काही

नरसय्या आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्ती
स्केटिंग करताना घडली भयंकर दुर्घटना
मलिकांनंतर कुणाचा नंबर? सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल | LOKNews24

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असल्यासारखी अक्षरश: उष्णता जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. आता मुंबईकरांना हवामान विभागाने इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेचा पार चढताच राहणार असल्याचं सांगितलं आहे. आधीच ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. ठाण्यातील मुरबाड परिसरात मंगळारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तिथे पारा 44 अंशांवर पोहोचला आहे. येत्या 48 तासात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. उष्माघात होऊ नये यासाठी मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 12 ते 3 या वेळात घराबाहेर पडू नका. घराबाहेर पडल्यास डोक्यावर छत्र किंवा स्कार्फ बांधून बाहेर पडा. शरीरात पाण्याची कमतरता जाणवू देऊ नका. सतत पाणी प्या, लिक्विड ड्रिंक जास्त घ्या. शक्य तेवढा आराम करा. देशातील अनेक राज्यांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आंध्र प्रदेशसह आठ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उन्हामुळे अनेक राज्यांत परीक्षांच्या काळातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही राज्यांत शाळांच्या वेळा अलीकडे आणून विद्यार्थ्यांना ऊन वाढण्यापूर्वी घरी पाठविले जात आहे.

COMMENTS